भारतीय गोलंदाजांचा जलवा; न्यूझीलंडच्या संघाचा 108 धावातच केला खुर्दा

परिस्थिती इतकी बिकट होती की न्यूझीलंड संघाने अवघ्या 15 धावांत पाच विकेट गमावल्या होत्या.
New Zealand team all out in 108 runs
New Zealand team all out in 108 runsInd Vs Nz 2nd ODI

भारत आणि न्यूझीलंड यांच्यात शनिवारी वनडे मालिकेतील दुसरा सामना खेळला गेला. टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून गोलंदाजी निवडली आणि हा निर्णय योग्य ठरला. टीम इंडियाच्या वेगवान गोलंदाजांनी कमाल केली आणि मोहम्मद शमीच्या नेतृत्वाखाली गोलंदाजांनी न्यूझीलंडवर हल्ला चढवला.

परिस्थिती इतकी बिकट होती की न्यूझीलंड संघाने अवघ्या 15 धावांत पाच विकेट गमावल्या होत्या. एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासातील न्यूझीलंडची ही सर्वात वाईट कामगिरी होती, जिथे त्यांनी त्यांचा निम्मा संघ इतक्या कमी धावसंख्येसाठी गमावला. त्यानंतर न्यूझीलंडचा संघ अवघ्या 108 धावांवर सर्वबाद झाला.

दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात न्यूझीलंडचे पहिले 5 विकेट

• पहिली विकेट - फिन ऍलन, 1-0 0.5 षटके

• दुसरी विकेट - हेन्री निकोल्स, 2-8 5.3 षटके

• तिसरी विकेट - डिरेल मिशेल, 3-9 6.1 षटके

• चौथी विकेट कॉनवे, 4-15 9.4 षटके

• पाचवी विकेट - टॉम लॅथम, 5-15 10.3 षटके

न्यूझीलंडची वनडेतील सर्वात कमी धावसंख्या (पाचव्या विकेटपर्यंत)

• 15/5 विरुद्ध भारत, रोयापूर 2023

• 18/5 विरुद्ध श्रीलंका, कोलंबो 2001

• 20/5 विरुद्ध बांगलादेश, मीरपूर 2010

• 21/5 विरुद्ध ऑस्ट्रेलिया, फरिदाबाद 2003

एकदिवसीय क्रिकेटमधील कोणत्याही संघाची सर्वात कमी धावसंख्या (पाचव्या विकेटवर भारताविरुद्ध)

• 15/5, न्यूझीलंड 2023

• 26/5, इंग्लंड 2022

• 29/5, पाकिस्तान 1997

• 30/5, झिम्बाब्वे 2005

न्यूझीलंड विरुद्ध भारत सर्वात कमी स्कोअर (ODI मध्ये)

79, विशाखापट्टणम 2016

103, चेन्नई 2010

108, रायपूर 2023

न्यूझीलंडविरुद्धच्या या सामन्यात मोहम्मद शमी पूर्ण रंगात दिसला, त्याने सुरुवातीपासूनच किवी संघावर दडपण ठेवले. मोहम्मद शमीने फिन ऍलन, डिरेल मिशेल आणि एम. ब्रेसवेल यांची विकेट घेत न्यूझीलंडला गुडघ्यावर आणले. या सामन्यात मोहम्मद शमीशिवाय हार्दिक पांड्याने 2, वॉशिंग्टन सुंदरने 2 बळी घेतले. न्यूझीलंडच्या फलंदाजीची अवस्था इतकी वाईट होती की केवळ 3 फलंदाज दुहेरी आकडा गाठू शकले. तर टॉप-5 फलंदाजांना दहा धावाही करता आले नाही.

Related Stories

No stories found.
logo
Mumbai Tak
www.mumbaitak.in