IPL 2023 Playoffs race : ‘या’ संघांचे प्लेऑफचे गणित बिघडले! असा झाला खेळ
चेन्नई सुपर किंग्स (CSK), लखनऊ सुपर जायंट्स (LSG), मुंबई इंडियन्स, रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (RCB), पंजाब किंग्स (PBKS), राजस्थान रॉयल्स (RR) यांचे आयपीएल क्वॉलिफायचे समीकरण कसं असेल?
ADVERTISEMENT

IPL 2023 Playoffs Final Race : लखनौ सुपर जायंट्स (एलएसजी) आणि मुंबई इंडियन्स (एमआय) यांच्यातील सामन्यानंतर आयपीएल प्लेऑफची समीकरणे बदलली आहेत. या विजयानंतर लखनौचा संघ आता गुणतालिकेत तिसऱ्या क्रमांकावर आहे. लखनौचे 15 गुण आहेत, त्यामुळे प्लेऑफमध्ये पोहोचण्याच्या आशा कायम आहेत.
दुसरीकडे, चेन्नई सुपर किंग्स (CSK), लखनऊ सुपर जायंट्स (LSG), मुंबई इंडियन्स, रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (RCB), पंजाब किंग्स (PBKS), राजस्थान रॉयल्स (RR) यांचे समीकरण काय असेल? तेच बघुयात… दिल्ली (DC) आणि सनरायझर्स हैदराबाद (SRH) हे संघ प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडले आहेत. त्याचवेळी, हार्दिक पंड्याचा गुजरात टायटन्स (GT) प्लेऑफमध्ये स्थान मिळवणारा पहिला संघ ठरला आहे.
MI vs LSG सामन्यामुळे काय झाले?
16 मे रोजी झालेल्या या सामन्यानंतर लखनौ अजूनही टॉप 2 संघांमध्ये पोहोचू शकेल. लखनौला आता उरलेला सामना कोलकात्याशी खेळायचा आहे, अशा परिस्थितीत जर कोलकात्याचा पराभव केला आणि दुसरीकडे चेन्नईचा संघ दिल्लीकडून हरल्यास चेन्नई आणि लखनौचे 17 गुण असतील.
दुसरीकडे, लखनौ शेवटचा सामना कोलकात्याकडून हरला, तर लखनौला इतर संघांच्या निकालावर अवलंबून राहावे लागेल.