Virat Kohli Sachin Tendulkar : कोहलीला सचिन म्हणाला, “मला 365 दिवस लागले, पण तू…”

भागवत हिरेकर

virat kohli equaled the historical record of Sachin tendulkar 49 centuries : विराट कोहलीचे सचिन तेंडुलकरने केले कौतुक. खास पोस्ट केली शेअर. जिंकली सर्वांची मने.

ADVERTISEMENT

Kohli has scored this stormy century in the 277th ODI inning of his career. Whereas Sachin had achieved this feat in his 451st innings.
Kohli has scored this stormy century in the 277th ODI inning of his career. Whereas Sachin had achieved this feat in his 451st innings.
social share
google news

Sachin Tendulkar Reaction on Virat Kohli 49th century : तब्बल तीन वेळा उंबरठ्यावर पोहोचूनही विराट कोहलीला शतकाने हुलकावणी दिली. पण, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध अखेर कोहलीने शतक झळकावलं आणि सचिन तेंडुलकरच्या विश्वविक्रमाची बरोबरी केली. त्याने 49वे शतक झळकावल्यानंतर सचिन तेंडुलकरने त्यांच्या कामगिरीचे कौतुक केले.

विश्वचषक स्पर्धेत जबरदस्त फार्मात असलेल्या विराटने रविवारी (5 नोव्हेंबर) आपला 35 वा वाढदिवस खास स्टाईलमध्ये साजरा केला. कोलकात्याच्या ईडन गार्डन्स मैदानावर भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सामना झाला. या सामन्यात कोहलीने कारकिर्दीतील 49 वे शतक झळकावून इतिहास रचला. वनडेमध्ये सर्वाधिक शतके झळकावण्याच्या बाबतीत त्याने सचिनच्या (49 शतके) ऐतिहासिक विक्रमाची बरोबरी केली.

कोहलीने 277 व्या डावात झळकावले 49 वे शतक

कोहलीने कारकिर्दीतील 277व्या वनडे इनिंगमध्ये हे झंझावाती शतक झळकावले. तर सचिनने आपल्या 451व्या डावात ही कामगिरी केली होती. या सामन्यात कोहलीने 121 चेंडूत 101 धावांची नाबाद खेळी केली. त्याने 10 चौकार मारले. सचिन तेंडुलकरसह क्रीडा, राजकारण आणि चित्रपट जगतातील दिग्गजांही कोहलीच्या या कामगिरीवर फिदा झाले.

कोहली 49 शतकांच्या विक्रमाशी बरोबरी केल्यानंतर सचिनने त्याचे कौतुक केले आणि हा विक्रम मोडल्याबद्दल त्याला शुभेच्छाही दिल्या. सचिन म्हणाला की, मला आशा आहे की तू लवकरच 49 वरून 50 जाशील आणि पुढील काही दिवसांत माझा हा विक्रम मोडीत काढशील.

हे वाचलं का?

    follow whatsapp