शेन वॉर्नच्या मृत्यूनंतर त्याच्या काउंसलरने उघड केली अनेक गुपिते
ऑस्ट्रेलियन दिग्गज शेन वॉर्नच्या मृत्यूला आता एक आठवड्याहून अधिक काळ लोटला आहे. शेन वॉर्नला 4 मार्च रोजी थायलंडमध्ये हृदयविकाराचा झटका आला होता. ज्यामध्ये त्याचा मृत्यू झाला होता. आता त्यांचे पार्थिव ऑस्ट्रेलियाला नेण्यात आले आहे. दरम्यान, शेन वॉर्नची काउंसलर पुढे आली आहे. जिने शेन वॉर्नबद्दल अनेक गोष्टी मांडल्या आहेत. द सनच्या वृत्तानुसार, शेन वॉर्नची काउंसलर लियान […]
ADVERTISEMENT


ऑस्ट्रेलियन दिग्गज शेन वॉर्नच्या मृत्यूला आता एक आठवड्याहून अधिक काळ लोटला आहे. शेन वॉर्नला 4 मार्च रोजी थायलंडमध्ये हृदयविकाराचा झटका आला होता. ज्यामध्ये त्याचा मृत्यू झाला होता. आता त्यांचे पार्थिव ऑस्ट्रेलियाला नेण्यात आले आहे. दरम्यान, शेन वॉर्नची काउंसलर पुढे आली आहे. जिने शेन वॉर्नबद्दल अनेक गोष्टी मांडल्या आहेत.

द सनच्या वृत्तानुसार, शेन वॉर्नची काउंसलर लियान यंग म्हणतात की, शेन वॉर्न हा मागील काही काळ खूप आनंदी होता आणि त्याला असं वाटत होतं की त्याच्याकडे अजून किमान 30 वर्षांचे आयुष्य आहे. लियान यंग 2015 पासून शेन वॉर्नशी काउंसलिंगमुळे जोडली गेली होती. ती त्याला नातेसंबंधांबाबत नेहमी सल्ला देत असे.










