श्रीलंकेविरुद्ध मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा, कसोटी संघातून अजिंक्य-पुजाराचा पत्ता कट

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

भारताच्या आगामी श्रीलंकेविरुद्ध दौऱ्यासाठी बीसीसीआयच्या निवड समितीने संघाची घोषणा केली आहे. २४ फेब्रवारीपासून भारत आणि श्रीलंका यांत्यात ३ टी-२० आणि २ कसोटी सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे. रोहित शर्माकडे कसोटी संघाचं कर्णधारपद सोपवण्यात आलेलं असून गेल्या काही दिवसांपासून फॉर्मात नसलेल्या अजिंक्य रहाणे आणि चेतेश्वर पुजाराचा पत्ता या मालिकेतून कापण्यात आला आहे.

ADVERTISEMENT

असा असेल श्रीलंकेविरुद्ध कसोटी मालिकेसाठी भारताचा संघ –

रोहित शर्मा (कर्णधार), मयांक अग्रवाल, प्रियांक पांचाळ, विराट कोहली, श्रेयस अय्यर, हनुमा विहारी, शुबमन गिल, ऋषभ पंत, के.एस.भरत (दोन्ही यष्टीरक्षक), रविचंद्रन आश्विन (फिटनेसवर अवलंबून), रविंद्र जाडेजा, जयंत यादव, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह (उप-कर्णधार), मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव आणि सौरभ कुमार.

हे वाचलं का?

याचसोबत ३ टी-२० सामन्यांच्या मालिकेसाठीही निवड समितीने संघाची घोषणा केली आहे. टी-२० मालिकेसाठी भारताचा संघ पुढीलप्रमाणे –

रोहित शर्मा (कर्णधार), ऋतुराज गायकवाड, इशान किशन, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, व्यंकटेश अय्यर, दीपक हुडा, जसप्रीत बुमराह (उप-कर्णधार), भुवनेश्वर कुमार, दीपक चहर, हर्षल पटेल, मोहम्मद सिराज, संजू सॅमसन, रविंद्र जाडेजा, युजवेंद्र चहल, रवी बिश्नोई, कुलदीप यादव आणि आवेश खान

ADVERTISEMENT

टीम इंडियावर आता मुंबईच्या ‘हिटमॅन’ची सत्ता, कसोटी संघाचं कर्णधारपद रोहितकडे

ADVERTISEMENT

संघाची घोषणा करताना निवड समितीचे अध्यक्ष चेतन चौहान यांनी पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तरं दिली. ज्यात रणजी ट्रॉफीत सौराष्ट्राविरुद्ध शतक झळकावलेल्या अजिंक्यची निवड का झाली नाही असं विचारलं असता, निवड समिती ही कधीच कोणत्याही इनिंगबद्दल संतुष्ट नसते असं चेतन शर्मांनी सांगितलं. अजिंक्य हा मोठा खेळाडू आहे आणि त्याचं सध्या काय बिनसलंय हे त्याने स्वतः तपासण्याची गरज आहे. याचसाठी आम्ही त्याला रणजी क्रिकेट खेळायला सांगितलं. त्याने तिकडे जाऊन धावा केल्या, स्वतःत सुधारणा केली तर तो नक्कीच संघात परत येऊ शकतो.

विराट-ऋषभ पंतची तिसऱ्या टी-२० मधून माघार, श्रीलंका दौऱ्यातूनही विश्रांती मिळण्याचे संकेत

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT