Asia Cup Final 2023 : रोहित शर्मा करणार विक्रमांची मालिका, तेंडुलकर-धोनीला टाकणार मागे!

भागवत हिरेकर

ADVERTISEMENT

asia Cup 2023 Final News marathi : Rohit will leave behind Mohammad Azharuddin, Mahendra Singh Dhoni, Navjot Singh Sidhu and Sachin Tendulkar, who had played four finals each.
asia Cup 2023 Final News marathi : Rohit will leave behind Mohammad Azharuddin, Mahendra Singh Dhoni, Navjot Singh Sidhu and Sachin Tendulkar, who had played four finals each.
social share
google news

Rohit Sharma Asia Cup 2023 : आशिया चषक 2023 च्या अंतिम सामन्यात भारतीय क्रिकेट संघाचा सामना श्रीलंकेशी होणार आहे. दोन्ही संघांमधील हा ब्लॉकबस्टर सामना आज (17 सप्टेंबर) कोलंबो येथे खेळला जाईल. भारतीय वेळेनुसार दुपारी 3 वाजता प्रेमदासा स्टेडियमवर होणार आहे. या सामन्यात टीम इंडियाची जबाबदारी रोहित शर्माच्या खांद्यावर असेल, तर दासून शनाका श्रीलंका संघाचे नेतृत्व करणार आहे. (Rohit Sharma will set a series of records in the Asia Cup 2023 final)

या सामन्यात सर्वांच्या नजरा भारतीय कर्णधार रोहित शर्मावर खिळल्या आहेत. अंतिम सामन्यात मैदानावर येताच रोहित एक मोठा विक्रम आपल्या नावावर करेल. रोहित शर्मा पाचव्यांदा आशिया कप फायनलमध्ये खेळणार आहे. भारतीय संघाकडून सर्वाधिक वेळा फायनल खेळण्याचा रेकॉर्ड त्याच्या नावे होईल.

या बाबतीत रोहित शर्मा मोहम्मद अझरुद्दीन, महेंद्रसिंग धोनी, नवज्योतसिंग सिद्धू आणि सचिन तेंडुलकर यांना मागे टाकेल. हे सर्व खेळाडून प्रत्येकी चार फायनल खेळलेले आहेत.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

सचिनचा विक्रम एक पाऊल दूर

रोहित शर्माने अंतिम सामन्यात 33 धावा केल्या, तर तो आशिया चषकाच्या वनडे फॉरमॅटमध्ये भारतासाठी सर्वाधिक धावा करणारा खेळाडू बनेल. रोहित शर्मा या बाबतीत सचिन तेंडुलकरला मागे टाकेल. एवढेच नाही तर 61 धावा केल्यानंतर रोहित आशिया चषकाच्या वनडे फॉरमॅटमध्ये 1000 धावाही पूर्ण करेल.

आशिया चषकाच्या वनडे फॉरमॅटमध्ये 1000 धावा करणारा तो पहिला भारतीय ठरणार आहे. सचिन तेंडुलकरने आशिया कपच्या वनडे फॉरमॅटमध्ये 23 सामन्यांत 51.10 च्या सरासरीने 971 धावा केल्या होत्या.

ADVERTISEMENT

Asia Cup Viral Video : हातात ड्रिंक्स आणि कांगारू उड्या, विराट असा धावला की…

तर रोहितने आशिया कपच्या वनडे फॉरमॅटमध्ये आतापर्यंत 27 सामने खेळले असून 939 धावा केल्या आहेत. या काळात रोहितची सरासरी 46.95 राहिली आहे. रोहितने अंतिम सामन्यात अर्धशतक झळकावल्यास तो आशिया चषकाच्या वनडे फॉरमॅटमध्ये 50 किंवा त्याहून अधिक धावा करणारा कर्णधारही बनेल. या बाबतीत रोहित शर्मा अर्जुन रणतुंगा (6) लाही मागे टाकेल.

ADVERTISEMENT

रोहित शर्माचा 250 वा एकदिवसीय सामना

रोहित शर्माचा श्रीलंकेविरुद्धचा सामना हा त्याचा 250 वा एकदिवसीय सामना असेल. त्याने आतापर्यंत एकूण 249 एकदिवसीय सामने खेळले आहेत. सचिन तेंडुलकर (463), एमएस धोनी (347), राहुल द्रविड (340), मोहम्मद अझरुद्दीन (334), सौरव गांगुली (308), युवराज सिंग (301), विराट कोहली (279), अनिल कुंबळे (269) अधिक खेळले आहेत. त्याच्यापेक्षा एकदिवसीय सामने खेळले आहेत.

मेंडिस-शानाका यांनाही इतिहास रचण्याची संधी

श्रीलंकेचा यष्टीरक्षक फलंदाज कुसल मेंडिसलाही मोठा विक्रम करण्याची संधी असेल. मेंडिसने 93 धावा केल्या तर तो आशिया कप (ODI) च्या एकाच मौसमात सर्वाधिक धावा करणारा यष्टिरक्षक फलंदाज बनेल. या बाबतीत कुमार संगकारा सध्या 345 धावांसह अव्वल स्थानावर आहे. मेंडिसने सध्याच्या स्पर्धेत पाच डावांत 50.60 च्या सरासरीने आणि 90.03 च्या स्ट्राईक रेटने 253 धावा केल्या आहेत.

Supriya Sule : गुप्तेंसमोर सुप्रिया सुळे का रडल्या, खुप्ते तिथे गुप्ते कार्यक्रमात काय घडलं?

जर श्रीलंकेच्या संघाने विजेतेपद पटकावले तर दासून शनाका सलग दोन आशिया चषक जिंकणारा पहिला कर्णधार बनेल, तोही वेगवेगळ्या फॉरमॅटमध्ये. उल्लेखनीय बाब म्हणजे शनाकाच्या नेतृत्वाखाली गतवर्षी श्रीलंका आशिया चषक टी-20 फॉर्मेटमध्ये चॅम्पियन बनला होता. त्यानंतर अंतिम फेरीत श्रीलंकेने पाकिस्तानचा पराभव केला.

भारतीय संघाला आठव्यांदा विजेतेपद मिळवण्याची संधी

भारतीय संघाने अंतिम सामना जिंकल्यास आठव्यांदा विजेतेपद पटकावणार आहे. आशिया कप (T20, ODI) च्या इतिहासात भारतीय संघाने सर्वाधिक 7 वेळा विजेतेपद पटकावले आहे. भारताने 1984, 1988, 1990/91, 1995, 2010, 2016 आणि 2018 मध्ये आशिया कप विजेतेपद पटकावले.

दुसऱ्या स्थानावर श्रीलंका आहे ज्याने 6 वेळा आशिया चषक जिंकला आहे. श्रीलंकेच्या संघाने 1986, 1997, 2004, 2008, 2014 आणि 2022 मध्ये आशिया चषकाचे विजेतेपद पटकावले आहे. तर 2000 आणि 2012 मध्ये पाकिस्तानने आशिया कप ट्रॉफी जिंकली होती.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT