IPL 2021: Soft Signal नाही, ९० मिनीटांमध्ये संपवायची इनिंग…BCCI कडून नवीन नियम जाहीर
आयपीएलचा चौदावा सिझन अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. ९ एप्रिलपासून भारतात आयपीएलच्या चौदाव्या सिझनला सुरुवात होणार आहे. रोहित शर्माची मुंबई इंडियन्स आणि विराट कोहलीच्या RCB मध्ये सलामीचा सामना रंगणार आहे. या नवीन सिझनसाठी BCCI ने काही नवीन नियम बनवले आहेत. जाणून घेऊयात हे ५ नियम कोणते आहेत, ज्यामुळे येणारा आयपीएलचा सिझन वेगळा ठरु शकतो. […]
ADVERTISEMENT
आयपीएलचा चौदावा सिझन अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. ९ एप्रिलपासून भारतात आयपीएलच्या चौदाव्या सिझनला सुरुवात होणार आहे. रोहित शर्माची मुंबई इंडियन्स आणि विराट कोहलीच्या RCB मध्ये सलामीचा सामना रंगणार आहे. या नवीन सिझनसाठी BCCI ने काही नवीन नियम बनवले आहेत. जाणून घेऊयात हे ५ नियम कोणते आहेत, ज्यामुळे येणारा आयपीएलचा सिझन वेगळा ठरु शकतो.
ADVERTISEMENT
Soft Signal नाही –
BCCI ने आयपीएलच्या चौदाव्या सिझनसाठी Soft Signal चा पर्याय काढला आहे. इंग्लंडविरुद्ध पार पडलेल्या टी-२० मालिकेत सूर्यकुमार यादवला आऊट देताना अंपायर अनंतपद्मनाभन यांनी दिलेला सॉफ्ट सिग्नल आणि त्यानंतर थर्ड अंपायर विरेंद्र शर्मा यांचा निर्णय वादाच्या भोवऱ्यात सापडला होता. या प्रकरणातून धडा घेत BCCI ने नवीन सिझनसाठी Soft Signal हा पर्याय काढला आहे.
हे वाचलं का?
Short Run –
शॉर्ट रनच्या केसमध्ये थर्ड अंपायरला रिव्ह्यू करण्याचे अधिकार मिळाले असून थर्ड अंपायर आता मैदानावरील अंपायर्सचे निर्णय बदलूही शकतात. IPL 2020 मध्ये पंजाब विरुद्ध दिल्ली सामन्यात अंपायर नितीन मेनन यांनी शॉर्ट रनचा एक वादग्रस्त निर्णय दिला होता. ज्यामुळे पंजाबचा संघ एका धावेने सामना हरला होता.
ADVERTISEMENT
No Ball –
ADVERTISEMENT
IPL गव्हर्निंग काऊन्सिलच्या नवीन नियमांनुसार थर्ड अंपायर मैदानावरील अंपायरचा नो-बॉलचा निर्णय ओव्हररुल करु शकतो. अनेकदा हाईट नो-बॉलचा कॉल देत असताना मैदानावरील अंपायर्सकडून चूक होते…अशावेळी थर्ड अंपायर्स हा निर्णय रद्द करु शकतात.
९० मिनीटांमध्येच संपवा इनिंग –
गव्हर्निंग काऊन्सिलच्या नवीन नियमांनुसार आता प्रत्येक इनिंग ही ९० मिनीटांमध्ये संपवणं बंधनकारक असणार आहे. आयपीएल २०२० मध्ये अनेकदा सामन्यांची अनावश्यक वाढत जाणारी वेळ हा मुद्दा चर्चेत होता. आधीच्या नियमानुसार २० वी ओव्हर नव्वदाव्या मिनीटाला किंवा त्यानंतर सुरु व्हायची. अनेकदा संघ रणनिती आखण्यासाठी वेळ घालवण्याचे प्रकार करत असतात. यामुळे सामन्याची वेळ वाढत जाते. यावर नियंत्रण मिळवण्यासाठी गव्हर्निंग काऊन्सिलने हा निर्णय घेतला आहे.
Super Over –
एखादा सामना बरोबरीत सुटल्यानंतर टी-२० मध्ये सुपरओव्हर खेळवली जाते. आयपीएल २०२० मध्ये पंजाब विरूद्ध मुंबई मॅचमध्ये दोन सुपरओव्हर खेळवल्या गेल्या. आयपीएलच्या नवीन नियमानुसार मॅच बरोबरीत सुटल्यास त्यानंतर एक तास निकाल लागेपर्यंत सुपर ओव्हर खेळवली जाऊ शकते.
आता थांबायचं नाही…विराट कोहलीकडून IPL 2021 ची तयारी सुरु
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT