IPL 2024 : बनायचं होतं विकेटकीपर पण बॉलिंगने करतोय 'गदर', कोण आहे यश ठाकुर?

रोहिणी ठोंबरे

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

Who Is Yash Thakur? : इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2024 च्या सामना क्रमांक-21 मध्ये, लखनौ सुपर जायंट्स (LSG) ने गुजरात टायटन्स (GT) चा 33 धावांनी पराभव केला. लखनौच्या भारतरत्न श्री अटल बिहारी वाजपेयी इकानाम स्टेडियमवर रविवारी (7 एप्रिल) खेळल्या गेलेल्या या सामन्यात यजमान संघाने 164 धावांचे लक्ष्य ठेवले होते. याला प्रत्युत्तर देताना गुजरात टायटन्सचा संघ केवळ 130 धावांवरच मर्यादित राहिला. (IPL 2024 Wanted to be a wicketkeeper but Doing amazing bowling who is 25 years Yash Thakur)

लखनौ सुपर जायंट्सच्या विजयाचा हिरो वेगवान गोलंदाज यश ठाकूर होता, त्याने शानदार गोलंदाजी करत 30 धावांत 5 बळी घेतले. आयपीएल 2024 मध्ये पहिल्यांदाच एका गोलंदाजाने पाच विकेट घेतल्या. यशने त्याच्या पहिल्याच षटकात गुजरातचा कर्णधार शुभमन गिलला बोल्ड केले. यानंतर, यशला पुन्हा गोलंदाजीच्या आघाडीवर ठेवण्यात आले तेव्हा त्याने दुहेरी विकेट मेडन ओव्हर टाकले. मात्र, यशला त्याच्या तिसऱ्या षटकात कोणतेही यश मिळाले नाही. मात्र शेवटच्या षटकात त्याने दोन विकेट घेत आपले पंजे तर उघडलेच याशिवाय संघाला विजयापर्यंत नेले.

शुभमन गिल व्यतिरिक्त यश ठाकूरने विजय शंकर, राशिद खान, राहुल तेवतिया आणि नूर अहमद यांची विकेट घेतली. यश ठाकूरची ही कामगिरी खूप महत्त्वाची आहे. या सामन्यादरम्यान लखनऊचा वेगवान गोलंदाज मयंक यादव जखमी झाला, अशा परिस्थितीत विकेट घेण्याची जबाबदारी त्याच्यावर आली. यशने आपल्या संघाच्या भरवशावर राहून चमकदार कामगिरी केली. मयंक आणि मोहसीन खान या वेगवान गोलंदाजांच्या दुखापतीमुळे लखनौ संघाला यश ठाकूरकडून आगामी सामन्यांमध्येही दमदार कामगिरीची अपेक्षा असेल.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

यश ठाकूर धोनी-उमेश यांना मानतो आदर्श

यश ठाकूरचा जन्म 28 डिसेंबर 1998 रोजी कोलकाता येथे झाला. तो विदर्भासाठी देशांतर्गत क्रिकेट खेळतो. विशेष म्हणजे यशला त्याच्या क्रिकेट करिअरच्या सुरुवातीला विकेटकीपर बनायचे होते. यासाठी तो आदर्श म्हणून भारतीय दिग्गज महेंद्रसिंग धोनीला मानतो. एकदा विदर्भाचा माजी कर्णधार आणि प्रशिक्षक प्रवीण हिंगणीकर यांने यश ठाकूरला नेटमध्ये गोलंदाजी करताना पाहिलं आणि त्यानंतर त्याला वेगवान गोलंदाज होण्याचा सल्ला दिला.

या युवा खेळाडूला वेगवान गोलंदाजीत करिअर करण्यासाठी पटवणे हे हिंगणीकर यांच्यासाठी अवघड काम होते. पण त्यात तो यशस्वी झाला. 25 वर्षीय यश ठाकूरने विदर्भासाठी आतापर्यंत 22 प्रथम श्रेणी सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्याने 67 बळी घेतले आहेत. यशच्या नावावर 37 लिस्ट-ए सामन्यांमध्ये 54 विकेट आहेत. यशला 49 टी-20 सामने खेळण्याचा अनुभव आहे, ज्यामध्ये त्याने 74 विकेट घेतल्या आहेत. यश ठाकूर भारतीय वेगवान गोलंदाज उमेश यादवलाही आपला आदर्श मानतो. उमेश देशांतर्गत क्रिकेटमध्येही विदर्भाचे प्रतिनिधित्व करतो.

ADVERTISEMENT

IPL 2023 मध्येही केली होती जबरदस्त कामगिरी!

IPL 2023 च्या लिलावात लखनौ सुपर जायंट्सने यश ठाकूरला 45 लाख रुपयांना विकत घेतले. यशने त्या सीझनमध्ये लखनौसाठी 9 सामने खेळले. या काळात त्याने 9.08 च्या इकॉनॉमी रेटने 13 विकेट घेतल्या. आता IPL 2024 हा देखील यशसाठी चांगला सीझन ठरत आहे. त्याने तीन सामन्यांत एकूण 6 बळी घेतले आहेत.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT