Vinesh Phogat Silver Case: विनेशने सोडले ऑलिम्पिक व्हिलेज; निकाल नेमका कधी लागणार?
Vinesh Phogat Silver Medal or Not: भारतीय कुस्तीपटू विनेश फोगाटने कोर्ट ऑफ आर्बिट्रेशन फॉर स्पोर्ट्समध्ये याचिका दाखल केली होती. कोर्टाच्या निकालाकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
विनेश फोगाटच्या याचिकेवर निकाल येणार
निकालापूर्वी विनेश फोगाटने ऑलिम्पिक व्हिलेज सोडले
१३ ऑगस्ट रोजी पदकाचा निकाल लागणार
Vinesh Phogat Silver Verdict: भारतीय कुस्तीपटू विनेश फोगाटला रौप्य पदक मिळणार की नाही, याबद्दलचा सस्पेन्स कायम आहे. विनेश फोगाटच्या याचिकेवर सुनावणी झालेली असून, 13 ऑगस्ट रोजी निकाल लागण्याची शक्यता आहे. विनेश फोगाटने क्युबाच्या कुस्तीपटूसोबत संयुक्तपणे रौप्य पदक देण्याची मागणी केलेली आहे. (vinesh phogat silver case updates in marathi)
पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत महिलांच्या ५० किलो वजनी कुस्ती गटात विनेश फोगाट खेळत होती. मात्र, ती अंतिम फेरीत पोहोचली होती. पण, वजन जास्त आढळून आल्यानंतर तिला अपात्र ठरवण्यात आले. त्यानंतर विनेश फोगाटने रौप्य पदक देण्याची मागणी केली होती. ९ ऑगस्ट रोजी या प्रकरणावर सुनावणी झाली.
विनेश फोगाटने ऑलिम्पिक व्हिलेज सोडले
इंडिया टुडेने दिलेल्या वृत्तानुसार, कोर्टाचा निकाल येण्यापूर्वीच कुस्तीपटू विनेश फोगाटने ऑलिम्पिक व्हिलेज सोडले आहे. तिचा एक व्हिडीओही समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये विनेश फोगाट एक बॅग घेऊन बाहेर जाताना दिसत आहे. मात्र, ती भारतात १३ ऑगस्ट रोजी पोहोचणार की, १४ ऑगस्टला, याबद्दल अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही.
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
हेही वाचा >> '... तर 1500 रुपये खात्यातून परत घेईन', नव्या वादाला फुटलं तोंड
विनेशला रौप्य पदक मिळणार की नाही?
५० किलो वजनी कुस्ती गटात अंतिम फेरीत पोहोचलेल्या विनेश फोगाटला अपात्र ठरवण्यात आले. पण, तिला रौप्य पदक देण्याची मागणी होत आहे. विनेशने या प्रकरणी सीएएस कोर्टात धाव घेतली होती. हे कोर्ट 13 ऑगस्ट रोजी भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्री ९.३० वाजता निकाल देण्याची शक्यता आहे.
हेही वाचा >> पक्ष फोडण्याची स्पर्धा घेतली तर पवार साहेबांना गोल्ड मेडल: फडणवीस
विनेश फोगाटला १०० ग्रॅम वजन जास्त भरल्याने अपात्र ठरवण्यात आले. त्यामुळे भारताच्या सुवर्ण पदकाचे स्वप्न भंगले. त्याचबरोबर रौप्य पदकही हातचे गेले. तिच्या जागी क्युबाची कुस्तीपटू युस्नेलिस गुजमान लोपेजला संधी मिळाली. तिला विनेशने उपांत्य फेरीत हरवले होते. त्यानंतर विनेश या निर्णयाविरोधात कोर्ट ऑफ आर्बिट्रेशन फॉर स्पोर्ट्सचे दार ठोठावले.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT