Tokyo Olympics 2021 : आश्वासक सुरूवातीनंतर तलवारबाजीत भवानीदेवीचा पराभव
फेन्सिंग अर्थात तलवारबाजीच्या खेळात भारताच्या भवानीदेवीने ट्युनिशियाच्या नादिया अझिझीवर 15-3 दणदणित विजय मिळवला. मात्र पुढच्या लढतीत तिला पराभवाचा सामना करावा लागला. फ्रान्सच्या मनोन ब्रुनेटनं भवानीवर 15-7 असा विजय मिळवला. ऑलिम्पिकमध्ये या खेळात भारताचं प्रतिनिधीत्व करणारी भवानी पहिलीच खेळाडू आहे. पहिल्या फेरीत काय झालं? तामिळनाडूच्या सीए भवानी देवीने टोक्यो ऑलिम्पिकमध्ये तलवारबाजीत भारताचं प्रतिनिधित्व करताना इतिहास रचला. […]
ADVERTISEMENT

फेन्सिंग अर्थात तलवारबाजीच्या खेळात भारताच्या भवानीदेवीने ट्युनिशियाच्या नादिया अझिझीवर 15-3 दणदणित विजय मिळवला. मात्र पुढच्या लढतीत तिला पराभवाचा सामना करावा लागला. फ्रान्सच्या मनोन ब्रुनेटनं भवानीवर 15-7 असा विजय मिळवला. ऑलिम्पिकमध्ये या खेळात भारताचं प्रतिनिधीत्व करणारी भवानी पहिलीच खेळाडू आहे.
पहिल्या फेरीत काय झालं?
तामिळनाडूच्या सीए भवानी देवीने टोक्यो ऑलिम्पिकमध्ये तलवारबाजीत भारताचं प्रतिनिधित्व करताना इतिहास रचला. आपल्या देशाचं तलवारबाजीत प्रतिनिधीत्व करणाऱ्या भवानीदेवीने एकेरी महिला गटात विजयी सुरूवात केली. ट्यूनिशियाच्या नादिया बेन अजिजचा पराभव करत तलवारबाजीचा सामना जिंकला. ऑलिम्पिकमध्ये तलवारबाजीचा सामना जिंकणारी भवानी देवी भारताची पहिली महिला खेळाडू आहे. भवानी देवी (CA Bhavani Devi) नं महिला सेबर व्यक्तिगत टेबल ऑफ 64 सामन्यात 15-3 अशा फरकानं विजय मिळवला. मात्र पुढच्या फेरीत तिला पराभव स्वीकारावा लागला.
Tokyo Olympic : पदकविजेतच्या Mirabai ची इच्छा पूर्ण, Dominos India कडून मिळणार आयुष्यभर मोफत पिझ्झा