Ind vs Pak : भारत-पाक सामना रद्द! Reserve Day ला किती ओव्हर्सची मॅच होणार?

प्रशांत गोमाणे

ADVERTISEMENT

ind vs pak super 4 india vs pakistan match will be played in reserve day 11 september asia cup 2023
ind vs pak super 4 india vs pakistan match will be played in reserve day 11 september asia cup 2023
social share
google news

India vs Pakistan : टीम इंडिया आणि पाकिस्तान यांच्यातील सामना पावसामूळे थांबवण्यात आला होता. त्यानंतर काही तासांनी पंचांनी मैदानातून उतरून तपासणी केली.मात्र खेळण्याजोगी परिस्थिती नसल्याने हा सामना रद्द करण्यात आला. आता हा सामना उद्या सोमवारी रीझर्व्ह डे ला खेळवण्यात येणार आहे. त्यामुळे उद्या सोमवारी होणार सामना किती ओव्हर्सचा असणार आहे? असा प्रश्न क्रिकेट फॅन्सना पडला आहे. (ind vs pak super 4 india vs pakistan match will be played in reserve day 11 september asia cup 2023)

पावसामुळे खेळ थांबला तेव्हा राहुल 17 धावावर खेळत होता, तर विराट कोहलीने 8 धावा केल्या होत्या. त्यावेळी टीम इंडियाने 2 बाद 147 धावांवर होती. त्यानंतर सामना पुन्हा सुरू झाल्यास पाकिस्तानला बॅटींग देऊन 24 ओव्हर्स सामना खेळवून 206 धावांचे आव्हान देण्यात येईल असे बोलले जात होते.तसेच सामना 9 वाजता सुरु होईल असे देखील सांगितले होते. पण पंचानी येऊन मैदानाची पाहणी केली आणि सामना रीझर्व्ह डेला खेळवण्याबाबत निर्णय़ घेण्यात आला.

हे ही वाचा : Aditya L1ने तिसऱ्यांदा कक्षा बदलली, सुर्याच्या किती जवळ पोहोचला?

त्यामुळे आता हा सामना रिझर्व्ह डेला म्हणजेच सोमवारी 11 सप्टेंबरला खेळवण्यात येणार आहे. हा सामना संपूर्ण 50 ओव्हरचा होणार आहे. टीम इंडिया 24.1 ओव्हरपासून पुन्हा फलंदाजी करेल.त्यामुळे क्रिकेटप्रेमींना पुन्हा एकदा हा सामना पाहता येणार आहे. आता फक्त राखीव दिवशी पाऊस पडायला नको, अशी क्रिकेटप्रेंमींची मागणी आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

रोहित शर्मा आणि शुबमनची अर्धशतकी खेळी

पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम याने टॉस जिंकून टीम इंडियाला प्रथम फलंदाडजीचे आमंत्रण दिले. कर्णधार रोहित शर्मा आणि शुबमन गिल या दोघांनी दे दणादण फटकेबाजी केली. या दोघांनी 121 धावांची सलामी भागीदारी केली. या दरम्यान दोघांनी अर्धशतकं ठोकली. मात्र त्यानंतर दोघेही सलग 2 ओव्हर्समध्ये आऊट झाले. शुबमनने 58 आणि रोहितने 56 धावा केल्या. तर सामना थांबला तोवर केएल आणि विराट या दोघांनी अनुक्रमे नाबाद 17 आणि 8 धावा केल्या. तर पाकिस्तानकडून शाहीन अफ्रिदी आणि शादाब खान या दोघांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.

हे ही वाचा : Ajit Pawar : अजित पवारांनी पुन्हा काढला निवृत्तीचा मुद्दा, शरद पवारांना आव्हान देत म्हणाले…

    follow whatsapp

    ADVERTISEMENT