Ind vs WI :सूर्यकुमार यादव चमकला!खणखणीत अर्धशतकाच्या बळावर WI समोर इतक्या धांवाचे आव्हान

प्रशांत गोमाणे

ADVERTISEMENT

ind vs wi surykumar yadav hits half century wi need so much runs india vs west indies
ind vs wi surykumar yadav hits half century wi need so much runs india vs west indies
social share
google news

वेस्ट इंडिजविरूद्धच्या पाचव्या आणि निर्णायक टी20 सामन्यात सूर्यकुमार यादवची बॅट तळपली आहे. सूर्यकूमार यादवने 61 धावांची खेळी केली आहे. सुर्याच्या या खेळीच्या बळावर वेस्ट इंडिजसमोर 166 धावांचे आव्हान असणार आहे. आता वेस्ट इंडिज हे आव्हान पुर्ण करते की टीम इंडियाचे गोलंदाज त्यांना रोखण्यात यशस्वी ठरतात, हे पाहणे महत्वाचे असणार आहे.पाच सामन्यांच्या टी20 मालिकेत दोन्ही संघ 2-2 ने बरोबरीत आहेत. आता पाचवा सामना जिंकून मालिका कोण खिशात घालते, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. (ind vs wi surykumar yadav hits half century wi need so much runs india vs west indies)

टीम इंडियाचा कर्णधार हार्दिक पंड्याने टॉस जिकून फलंदाजीचा निर्णय़ घेतला होता. मात्र हा निर्णय फसला होता. कारण टीम इंडियाचे दोन्ही सलामीवीर एकेरी धावसंख्या करून बाद झाले. यशस्वी जयस्वाल 5,शुभमन गील 9 धावा करून बाद झाले होते. त्यानंतर मैदानात उतरलेल्या सुर्यकुमार यादव आणि तिलक वर्मा यांनी डाव सांभाळण्याचा प्रयत्न केला. पण तिलक वर्मा 27 धावा करून बाद झाला. त्याच्यामागून आलेला संजू सॅमसन देखील 13 धावा करून बाद झाला. टीम इंडियाची अशी अवस्था झाली होती की एका बाजून विकेट पडत होती, तर दुसऱ्या बाजूने सुर्यकुमार यादव एकाकी झूंज देत होता. हार्दिक पंड्या 14, अक्षर पटेल 13,अर्शदीप 8, कुलदीप शुन्य धावा करून बाद झाला.

हे ही वाचा : World Cup 2023: अवघे काही दिवसच शिल्लक, टीम इंडियासमोर आव्हानांचा डोंगर?

सुर्यकुमार यादवने एकाकी झूंज देत 61 धावा ठोकल्या. या खेळीत त्याने 4 खणखणीत चौकार खेचले, तर 3 गगनचुंबी षटकार लावले. या त्याच्या खेळीच्या बळावर टीम इंडिया 20 ओव्हरमध्ये 9 विकेट गमावून 165 धावाच ठोकू शकली आहे. वेस्ट इंडिजकडून रोमारीओ शेफर्डने 4 विकेट घेतल्या आहेत.तर अकिल होसेम आणि जेसन होल्डने प्रत्येकी एक विकेट घेतली आहे. तर रेस्टॉन चेसने 1 विकेट घेतली आहे.आता वेस्ट इंडिजसमोर 166 धावांचे आव्हान असणार आहे.आता वेस्ट इंडिज हे आव्हान पुर्ण करते की टीम इंडियाचे गोलंदाज त्यांना रोखण्यात यशस्वी ठरतात, हे पाहणे महत्वाचे असणार आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

दरम्यान पाच सामन्यांच्या टी20 मालिकेत दोन्ही संघ 2-2 ने बरोबरीत आहेत. आता पाचवा सामना जिंकून मालिका कोण खिशात घालते, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

हे ही वाचा : ODI WC 2023: भारत-पाक सामन्याची तारीख बदलली, ‘या’ दिवशी रंगणार हायव्होल्टेज सामना

    follow whatsapp

    ADVERTISEMENT