Ind vs ban test Series : भारतीय संघ अडचणीत; 37 धावांवर गमावल्या 4 विकेट्स

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

बांगलादेशविरुद्धच्या मालिकेतील दुसऱ्या आणि शेवटच्या कसोटीत भारतीय संघ अडचणीत सापडल्याचे दिसत आहे. 145 धावांच्या लक्ष्याला पाठलाग करताना टीम इंडियाने 37 धावांवर पहिले 4 विकेट गमावल्या आहेत. बांगलादेशने तासाभरात भारतीय संघाची ही अवस्था केली आहे. आता सामन्याच्या चौथ्या दिवशी टीम इंडियाला विजयासाठी 100 धावांची गरज आहे.

मालिकेतील हा शेवटचा कसोटी सामना ढाका येथे खेळला जात आहे. सामन्याच्या तिसऱ्या दिवशी (24 डिसेंबर) बांगलादेशने भारतीय संघाला 145 धावांचे लक्ष्य दिले होते. याला प्रत्युत्तर म्हणून तिसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत भारतीय संघाची अवस्था बिकट झाली. संघाने 4 गडी गमावून 45 धावा केल्या. अक्षर पटेल 26 आणि जयदेव उनाडकट 3 धावांवर नाबाद आहेत. दोघेही नाईट वॉचमन म्हणून उतरले होते.

पंत आणि अय्यर यांच्यावर आता सामना जिंकण्याची जबाबदारी आहे

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

आता चौथ्या दिवशी टीम इंडियाला विजयासाठी 100 धावांची गरज आहे. अशा परिस्थितीत हा दिवस खूप खास असेल आणि भारतीय संघाच्या विजयाची संपूर्ण जबाबदारी ऋषभ पंत आणि श्रेयस अय्यर यांच्या खांद्यावर असेल. पुढची विकेट पडली तर ऋषभ पंत आणि नंतर श्रेयस अय्यरला फलंदाजीला यावे लागेल. पहिल्या डावात पंतने 93 आणि अय्यरने 87 धावा केल्या होत्या. यानंतर खालच्या फळीत रविचंद्रन अश्विनही आहे, जो फलंदाजीतही कमाल दाखवू शकतो. पण त्यांच्यानंतर उमेश यादव आणि मोहम्मद सिराज यांच्याकडून अपेक्षा करणे व्यर्थ ठरेल. म्हणजेच सामना जिंकायचा असेल तर अश्विननंतर कोणाचीही पाळी येऊ नये आणि सामना जिंकावा यासाठी प्रयत्न करावे लागतील.

अशा प्रकारे भारतीय संघाने विकेट गमावल्या

ADVERTISEMENT

या कसोटी सामन्यात नाणेफेक जिंकल्यानंतर बांगलादेश संघाने प्रथम फलंदाजी करताना 227 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात भारतीय संघाने 314 धावा केल्या होत्या. यानंतर बांगलादेशचा संघ दुसऱ्या डावात केवळ 231 धावाच करू शकला आणि त्यामुळे टीम इंडियाला सामन्यात 145 धावांचे लक्ष्य मिळाले.

ADVERTISEMENT

त्यानंतर दुसऱ्या डावात भारतीय संघाची सुरुवात खूपच खराब झाली. संघाची पहिली विकेट 3 धावांच्या स्कोअरवर गमावली. कर्णधार के.एल राहुल 2 धावा करून बाद झाला. यानंतर उपकर्णधार चेतेश्वर पुजारा 6 धावा करून यष्टिचित झाला. त्यानंतर शुभमन गिलकडून आशा होती, पण तोही टिकू शकला नाही आणि त्यानेही 35 चेंडूत 7 धावा केल्या. या सामन्यात विराट कोहली पुन्हा एकदा फ्लॉप ठरला. त्याने 22 चेंडूंचा सामना केला आणि फक्त एक धाव घेत तो झेलबाद झाला. आता उद्याचा दिवस दोन्ही संघासाठी निर्णायक ठरणार आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT