RCB vs KKR IPL 2021: ‘हे’ दोन खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह, आजची मॅच रद्द
नवी दिल्ली: कोरोनाने आता थेट इंडियन प्रीमियर लीग (IPL) ला मोठा झटका दिला आहे. कारण कोरोनाच्या संसर्गामुळे आयपीएल स्पर्धेतील आजचा (3 मे, सोमवार) सामना रद्द करण्यात आला आहे. कोलकात नाइट रायडर्स (KKR) आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (RCB) या दोन संघांमध्ये आज सामना होणार होता. पण मिळालेल्या माहितीनुसार, केकेआरचे दोन खेळाडू हे कोरोना पॉझिटिव्ह (Corona Positive) […]
ADVERTISEMENT
नवी दिल्ली: कोरोनाने आता थेट इंडियन प्रीमियर लीग (IPL) ला मोठा झटका दिला आहे. कारण कोरोनाच्या संसर्गामुळे आयपीएल स्पर्धेतील आजचा (3 मे, सोमवार) सामना रद्द करण्यात आला आहे. कोलकात नाइट रायडर्स (KKR) आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (RCB) या दोन संघांमध्ये आज सामना होणार होता. पण मिळालेल्या माहितीनुसार, केकेआरचे दोन खेळाडू हे कोरोना पॉझिटिव्ह (Corona Positive) सापडल्याने आता थेट सामना रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
ADVERTISEMENT
दरम्यान, हा सामना येत्या काही दिवसात पुन्हा खेळवला जाणार आहे. मात्र, त्याची तारीख अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही. पण त्यामुळे आयपीएलमधील आजचा सामना मात्र होणार नाही. आयपीएलकडून देखील या वृत्ताला आता दुजोरा देण्यात आला आहे. त्यांनी आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवर याबाबतची सविस्तर माहिती दिली आहे.
UPDATE: IPL reschedules today's #KKRvRCB match after two KKR players test positive. #VIVOIPL
Details – https://t.co/vwTHC8DkS7 pic.twitter.com/xzcD8aijQ0
— IndianPremierLeague (@IPL) May 3, 2021
कोलकाता नाइट रायडर्स (KKR) संघातील फिरकीपटू वरुण चक्रवर्ती आणि संदीप वॉरियर्स या दोन खेळाडूंना कोरोनाची लागण झाली असल्याचं आता समोर आलं आहे. गेल्या चार दिवसात करण्यात आलेल्या कोरोना चाचणीतील तिसऱ्या राऊंडमध्ये हे दोघंही पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.
हे वाचलं का?
मिळालेल्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वीच वरुण चक्रवर्ती याला खांद्याची दुखापत झाली होती. आणि त्याच्याच स्कॅनिंगसाठी तो बायो-बबलमधून बाहेर पडला होता. याचवेळी त्याला कोरोनाची लाग झाली असण्याची शक्यता आता वर्तवण्यात येत आहे. दरम्यान, वरुण चक्रवर्तीसोबतच संदीप वॉरियर याला देखील कोरोनाची लागण झाल्याने आता आणखी कोणताही धोका पत्करण्यास बीसीसीआय तयार नसल्याने आजचा सामना रद्द करण्यात आला असून दोन्ही खेळाडूंना तात्काळ आयसोलेट करण्यात आलं आहे.
आयपीएलच्या 14व्या सीजनमधील 30वी मॅच ही अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये होणार होती. ही मॅच संध्याकाळी 7.30 वाजता सुरु होणार होती. पण केकेआरमधील दोन खेळाडू पॉझिटिव्ह सापडल्यानंतर आजची मॅच रद्द झाली आहे.
ADVERTISEMENT
कोरोना संक्रमणात बीसीसीआयने मजबूत बायो-बबल असल्याचं म्हटलं होतं. त्यानुसार 29 मॅच यशस्वीपणे खेळविण्यात देखील आल्या. चेन्नई आणि मुंबईतील आयपीएलचे सगळे सामने संपले आहेत. पण सध्या गुजरातमधील अहमदाबादमध्ये सामने सुरु आहेत. सध्या गुजरातमध्ये देखील मोठ्या प्रमाणात कोरोनाचे रुग्ण सापडत असल्याने आयोजकांची चिंता अधिक वाढली आहे.
ADVERTISEMENT
भारतात मागील काही दिवसांपासून दररोज कोरोनाचे 3 लाखांहून अधिक कोरोना रुग्ण सापडत आहेत. अशावेळी बीसीसीआयने IPL-14 मधील खेळाडूंसाठी बायो-बबलचे नियम अधिक कठोर केले होते. पण यानंतर देखील खेळाडू हे संसर्गापासून आपला बचाव करु शकले नाही.
असंही म्हटलं जात होतं की, हॉटेलमध्ये वास्तव्यास असलेल्या खेळाडू आणि सदस्यांना बाहेरून खाद्यपदार्थ देखील ऑर्डर करण्यास मनाई आहे. बायो-बबलमध्ये राहणाऱ्या खेळाडूंना आता फक्त हॉटेलमध्ये मिळणारे खाद्यपदार्थच खावे लागत आहेत. (ipl 2021 3 may match between kkr and rcb rescheduled after 2 kkr members test positive for covid 19)
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT