Team India Corona Case: शिखर धवनसह टीम इंडियाचे अनेक खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह, WI सीरीजआधी मोठा धक्का
Team India Corona Case: अहमदाबाद: भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील एकदिवसीय मालिका सुरू होण्यासाठी अवघे 4 दिवस बाकी असताना टीम इंडियाला मोठा झटका बसला आहे. भारतीय संघातील अनेक खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. यामध्ये शिखर धवन, ऋतुराज गायकवाड यांच्यासह काही खेळाडूंच्या नावाचा समावेश आहे. मिळालेल्या माहितीनुसार, टीम इंडियामध्ये कोरोनाची जी प्रकरणे समोर आली आहेत त्यात […]
ADVERTISEMENT
Team India Corona Case: अहमदाबाद: भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील एकदिवसीय मालिका सुरू होण्यासाठी अवघे 4 दिवस बाकी असताना टीम इंडियाला मोठा झटका बसला आहे. भारतीय संघातील अनेक खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. यामध्ये शिखर धवन, ऋतुराज गायकवाड यांच्यासह काही खेळाडूंच्या नावाचा समावेश आहे. मिळालेल्या माहितीनुसार, टीम इंडियामध्ये कोरोनाची जी प्रकरणे समोर आली आहेत त्यात खेळाडू आणि सपोर्ट स्टाफ दोघांचाही समावेश आहे.
ADVERTISEMENT
कोरोना पॉझिटिव्ह आढळलेल्या सर्वांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. यामध्ये शिखर धवन, ऋतुराज गायकवाड यांना कोरोना झाल्याची पुष्टी झाली आहे. बाकींच्याबाबत अधिकृत पुष्टी बीसीसीआयच्या वैद्यकीय पथकाच्या बुलेटीननंतर केली जाणार आहे.
सर्व खेळाडू अहमदाबादमध्ये
हे वाचलं का?
टीम इंडियाचे सर्व खेळाडू दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावरून परतल्यानंतर त्यांच्या घरी होते, पण आता सर्व एकदिवसीय मालिकेपूर्वी सर्व खेळाडू अहमदाबादमध्ये जमले आहेत. अशा परिस्थितीत येथे कोरोना चाचणी केल्यानंतर काही खेळाडूंचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.
भारतीय संघासाठी हा मोठा झटका आहे, कारण वेस्ट इंडिजविरुद्धचा पहिला वनडे सामना 6 फेब्रुवारीला अहमदाबादमध्ये खेळवला जाणार आहे. आता या सामन्याला केवळ तीन दिवस शिल्लक आहेत. अशा परिस्थितीत एवढ्या मोठ्या संख्येने खेळाडू पॉझिटिव्ह आढळून आले तर भारतासमोर प्लेइंग-11चे देखील संकट उभे राहू शकतं.
ADVERTISEMENT
एकदिवसीय मालिका प्रेक्षकांशिवाय
ADVERTISEMENT
भारतीय संघाला 6 फेब्रुवारीपासून वेस्ट इंडिजविरुद्ध वनडे मालिका सुरू करायची आहे. तीनही एकदिवसीय सामने अहमदाबादमध्येच खेळवले जाणार आहे. टीम इंडिया येथे पोहोचली असून आता सर्व खेळाडू क्वारंटाईन आहेत. कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर बीसीसीआयने सर्व एकदिवसीय सामने प्रेक्षकांशिवाय खेळवण्याचा निर्णय घेतला आहे.
रोहित शर्मा पूर्णवेळ कर्णधार झाल्यानंतर भारतीय संघाची ही पहिलीच एकदिवसीय मालिका आहे. परंतु याला आधीच कोरोनाचं ग्रहण लागलं आहे. रोहित शर्मा दुखापतीतून सावरल्यानंतर पुनरागमन करत आहे. त्यामुळे या मालिकेत कर्णधार म्हणून रोहित शर्मा कशी कामगिरी करणार याकडेच सर्वांचं लक्ष असणार आहे.
वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी टीम इंडिया:
वनडे टीम: रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), ऋतुराज गायकवाड, शिखर धवन, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, दीपक हुडा, ऋषभ पंत (विकेटकीपर), दीपक चहर, शार्दुल ठाकूर, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा आणि आवेश खान.
T20 संघ: रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), इशान किशन, विराट कोहली, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (विकेटकीपर), व्यंकटेश अय्यर, दीपक चहर, शार्दुल ठाकूर, रवी बिश्नोई, अक्षर पटेल, युझवेंद्र चहल, वॉशिंग्टन सुंदर, मोहम्मद सिराज, भुवनेश्वर कुमार, आवेश खान आणि हर्षल पटेल.
Ind vs Wi Team India : रोहित शर्मा कर्णधार! कोहलीही खेळणार; इंडिजविरुद्धच्या मालिकेसाठी संघाची घोषणा
भारत विरुद्ध वेस्ट इंडिज मालिका:
-
पहिली वनडे – ६ फेब्रुवारी, अहमदाबाद
-
दुसरी वनडे – ९ फेब्रुवारी, अहमदाबाद
-
तिसरी वनडे – १२ फेब्रुवारी, अहमदाबाद
-
पहिला T20I सामना – 15 फेब्रुवारी, कोलकाता
-
दुसरा T20I सामना – 18 फेब्रुवारी, कोलकाता
-
तिसरा T20 सामना – 20 फेब्रुवारी, कोलकाता
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT