Ind vs Aus final : मॅक्सवेलने कोहलीला मारला चेंडू, नंतर विराटने…; व्हिडिओ झाला व्हायरल
ind vs aus world cup 2003 final : ICC विश्वचषक 2023 (World Cup 2023 Final) च्या अंतिम सामन्यात, ऑस्ट्रेलियाचा (India vs Australia) फलंदाज ग्लेन मॅक्सवेलचा चेंडू अनवधानाने विराट कोहलीला लागला.
ADVERTISEMENT
Ind vs Aus Final : ICC विश्वचषक 2023च्या (World Cup 2023 Final) अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने (India vs Australia) नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पॅट कमिन्सचा हा निर्णय त्याच्या गोलंदाजांनी योग्य ठरवला. भारतीय फलंदाजांना चांगली कामगिरी करता आली नाही. अवघ्या 81 धावांतच इंडियाच्या तीन विकेट पडल्या होत्या. यानंतर विराट कोहली आणि केएल राहुलने जबाबदार खेळी केली.
ADVERTISEMENT
दरम्यान, फलंदाजी करत असताना एक घटना घडली ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. कोहली धावा घेत असताना मॅक्सवेलने थेट कोहलीच्या हातात चेंडू मारला. त्यानंतर कोहली छाती फुगवून मॅक्सवेलसमोर आला आणि दोघेही हसायला लागले. कोहली आणि मॅक्सवेलच्या या मैत्रीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
मॅक्सवेलने कोहलीला मारला चेंडू
भारताची फलंदाजी सुरू असताना डावाच्या 11व्या षटकात भारताला तिसरा धक्का ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्सने श्रेयस अय्यरच्या (4 धावा) रूपाने दिला. यानंतर केएल राहुल पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला आला आणि त्याने कोहलीसह सावध फलंदाजी करत डाव पुढे नेला.
हे वाचलं का?
कोहली फलंदाजी करत असताना तो एका धावेसाठी वेगाने धावला. यावर पुढे क्षेत्ररक्षण करणाऱ्या मॅक्सवेलने स्ट्राईक एंडला थ्रो केला. चेंडू आपल्या दिशेने येत असल्याचे पाहून कोहलीने हाताने तो अडवला. त्यामुळे चेंडू हेल्मेटला लागला नाही.
हे ही वाचा >> Ind vs Aus Final : टॉस जिंकूनही का केली नाही प्रथम फलंदाजी? कमिन्सने सांगितलं कारण
त्यानंतर मॅक्सवेल कोहलीच्या जवळ आला. कोहलीही छाती फूगवून उभा राहिला. एकमेकांसमोर आल्यानंतर दोन्ही खेळाडू हसायला लागले. हे दोन्ही खेळाडू आयपीएलमध्ये एकाच संघाकडून म्हणजे आरसीबीकडून खेळतात. त्यामुळे विश्वचषक २०२३ च्या अंतिम सामन्यात कोहली-मॅक्सवेलची मैत्री व्हायरल झाली होती.
ADVERTISEMENT
View this post on Instagram
ADVERTISEMENT
ऑस्ट्रेलियासमोर 241 धावांचे लक्ष्य
भारताने ऑस्ट्रेलियाला विजयासाठी 241 धावांचे लक्ष्य दिले. भारतीय संघाने 50 षटकांत सर्व गडी गमावून 240 धावा केल्या. नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजीला आलेल्या भारतीय संघाची सुरुवात चांगली झाली. पण, रोहित शर्मा बाद झाल्यानंतर ठराविक वेगाने फलंदाज बाद होत गेले.
हे ही वाचा >> स्टंप कॅमेरा ते ड्रोनची दृश्य! एका सामन्यासाठी स्टेडियममध्ये किती असतात कॅमेरे?
दरम्यान, केएल राहुलने 107 चेंडूत 66 धावांची संथ खेळी, तर विराट कोहलीने 63 चेंडूत 54 धावांची संथ खेळी केली. कर्णधार रोहित शर्माने 31 चेंडूत 47 धावा केल्या. तर सूर्यकुमार यादवला 28 चेंडूत केवळ 18 धावा करता आल्या. दुसरीकडे, ऑस्ट्रेलियन संघाकडून मिचेल स्टार्कने 5 बळी घेतले. तर पॅट कमिन्स आणि जोश हेझलवूडने 2-2 यश मिळवले.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT