T-20 World Cup : भारताला हरवायचंय? मग हे कराच…जावेद मियाँदादचा पाकिस्तान संघाला सल्ला

मुंबई तक

२४ ऑक्टोबरला दुबईत भारत आणि पाकिस्तान या दोन पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांमध्ये विश्वचषकात सामना रंगणार आहे. तब्बल २ वर्षांनी हे संघ समोरासमोर येणार आहेत. या सामन्याआधी झालेल्या सराव सामन्यांमध्ये दोन्ही संघांनी चांगली सुरुवात केली आहे. पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने भारताला हरवण्याचा आत्मविश्वास व्यक्त केलाय. परंतू वर्ल्डकप लढतींचा इतिहास हा भारताच्या बाजूने आहे. पाकिस्तानचे माजी खेळाडू जावेद मियाँदाद […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
google news

२४ ऑक्टोबरला दुबईत भारत आणि पाकिस्तान या दोन पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांमध्ये विश्वचषकात सामना रंगणार आहे. तब्बल २ वर्षांनी हे संघ समोरासमोर येणार आहेत. या सामन्याआधी झालेल्या सराव सामन्यांमध्ये दोन्ही संघांनी चांगली सुरुवात केली आहे. पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने भारताला हरवण्याचा आत्मविश्वास व्यक्त केलाय. परंतू वर्ल्डकप लढतींचा इतिहास हा भारताच्या बाजूने आहे.

पाकिस्तानचे माजी खेळाडू जावेद मियाँदाद यांनी वर्ल्डकपमध्ये भारताला हरवण्यासाठी पाकिस्तानच्या संघाला एक गुरुमंत्र दिला आहे.

T-20 World Cup : पाकिस्तान वठणीवर, अधिकृत जर्सीवर लिहीलं भारताचं नाव

“या स्पर्धेत पाकिस्तानला विजयी सूर गवसणं गरजेचं आहे, त्यासाठी भारताविरुद्धचा सामना हा अतिशय महत्वाचा आहे. भारताचा संघ हा तगडा संघ आहे, त्यांच्याकडे अनेक विख्यात खेळाडू आहेत. पण जर पाकिस्तानचा संघ कोणतीही भीती आणि दडपण न बाळगता खेळला तर आपण त्यांना नक्कीच हरवू शकतो. जर सर्व संघाने एकत्र येऊन चांगली कामगिरी केली तर पाकिस्तान या स्पर्धेत चांगली कामगिरी करेल.”

हे वाचलं का?