Paris Olympic 2024 : 46 सेकंदात प्रतिस्पर्ध्यांला गारं केलं, नंतर महिला बॉक्सरवर पुरूष असल्याचा आरोप; नेमका वाद काय?
Imene Khelif vs Angela Carini controversy : 46 सेकंदाच्या या लढतीत इमानने अँजेलाला दोन पंच हाणून सामना जिंकला होता. या सामन्यानंतर अँजेला कारिनीने इमान खलिफेवर पुरूष असल्याचा आरोप केला होता. या आरोपानंतर सोशल मीडियावर मोठा वाद पेटला होता.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

अँजेला कारिनीने इमान खलिफेवर पुरूष असल्याचा आरोप केला

या आरोपानंतर सोशल मीडियावर मोठा वाद पेटला

या प्रकरणात आयओसीने स्पष्टीकरण दिले
Imene Khelif vs Angela Carini controversy : संपूर्ण जगाचे लक्ष सध्या पॅरीस ऑलिम्पिकडे लागले आहे. या ऑलिम्पिकमधील बॉक्सिंग एक सामना खूपच वादात सापडला आहे.इटलीची अँजेला कारिनी आणि अल्जेरियाची इमान खलिफे यांच्यात लढत झाली. 46 सेकंदाच्या या लढतीत इमानने अँजेलाला दोन पंच हाणून सामना जिंकला होता. या सामन्यानंतर अँजेला कारिनीने इमान खलिफेवर पुरूष असल्याचा आरोप केला होता. या आरोपानंतर सोशल मीडियावर मोठा वाद पेटला होता. त्यानंतर आता या प्रकरणात आयओसीने स्पष्टीकरण दिले आहे. (paris olympic 2024 imene khelif vs angela carini controversy ioc and pbu gives big statement)
नेमकं घडलं काय ?
इटलीची अँजेला कारिनी आणि अल्जेरिया इमान खलिफा यांच्यात लढत सुरु झाली. इमानने करिनीच्या चेहऱ्यावर एक जोरदार ठोसा मारला. कारिनीला तो इतका जोरात लागला की ती एक क्षण हललीच.तिने काही क्षण थांबून खलिफेकडे पाठ फिरवली आणि कोपऱ्यात गेली. तिथून तिने प्रशिक्षकांकडे बघून डोळ्यांनीच सांगितले की ती स्पर्धा पुढे खेळणार नाही. त्यानंतर पंचाने सामना थांबवला.
पराभवाची घोषणा झाल्यानंतर खलिफेशी हात मिळविण्याससुद्धा कारिनीने नकार दिला, त्यानंतर ती रिंगमध्ये गुडघ्यावर बसली आणि ओक्साबोक्शी रडू लागली.
हे ही वाचा : Telecom Service Rule : कॉल, इंटरनेट सेवा झाली बंद, तर मिळणार नुकसान भरपाई, वाचा नवीन नियम
पत्रकारांशी बोलतानाही कारिनी रडत होती. ती म्हणाली, मी माझ्या वडिलांचा मान राखण्यासाठी बॉक्सिंगच्या रिंगणात उतरले होते पण मला हा ठोसा बसल्यावर प्रचंड वेदना झाल्या, माझा जीव जाण्याऐवजी मी मॅच सोडणं पसंत केलं.