Pr Chess Worldcup Final 2023:बुद्धीबळ विश्वचषकावर मॅग्नस कार्लसनने कोरलं नाव, प्रज्ञानंद ठरला उपविजेता

प्रशांत गोमाणे

ADVERTISEMENT

praggnanandhaa loose the match against magnus carlsen fide world cup chess tournament final 2023
praggnanandhaa loose the match against magnus carlsen fide world cup chess tournament final 2023
social share
google news

Fide World Cup Chess Tournament praggnanandhaa vs magnus carlsen Final: फिडे वर्ल्ड कप चेस टुर्नामेंटमधील अंतिम सामन्यात आज रमेशबाबू प्रज्ञानंद (praggnanandhaa) आणि मॅग्नस कार्लसनमध्ये (magnus carlsen)  अंतिम सामना रंगला होता. या अंतिम सामन्यात आता वर्ल्ड नंबर 1 बुद्धीबळपट्टू मॅग्नस कार्लसनने बाजी मारली आहे. मॅग्नस कार्लसनने हा अंतिम सामना जिंकला आहे. तर भारतीय बुद्धीबळपट्टू ग्रॅडमास्टर प्रज्ञाननंदाचा पराभव झाल्याने तो उपविजेता ठरला आहे. या सामन्यात प्रज्ञाननंदाने कार्लसनला काँटे की टक्कर दिली होती. ज्यामध्ये दोघांमधील दोन सामने ड्रॉ ठरले होते. मात्र टायर ब्रेकर सामन्यात मॅग्नस कार्लसनने सामना जिंकून फिडे वर्ल्ड कप चेस टुर्नामेंटवर (Fide World Cup Chess Tournament)  नाव कोरले आहे. (praggnanandhaa loose the match against magnus carlsen fide world cup chess tournament final 2023)

ADVERTISEMENT

हे ही वाचा : KL Rahul: BCCI ची केएल राहुलवर मेहरबानी का..? ‘या’ खेळाडूंवर अन्याय…

फिडे वर्ल्ड कप चेस टुर्नामेंटचा (Fide World Cup Chess Tournament)  अंतिम सामना तब्बल तीन दिवस चालला. भारताच्या 18 वर्षाच्या प्रज्ञानंदसमोर 32 वर्षीय कार्लसनचे आव्हान होते. 32 वर्षीय मॅग्नस कार्लसन हा वर्ल्ड नंबर 1 बुद्धीबळपट्टू आहे. या वर्ल्ड नंबर 1 बुद्धीबळपट्टूला हरवणे प्रज्ञानंदसाठी आव्हानात्मक होते. मात्र तरी देखील प्रज्ञानंद कार्लसन तगडं आव्हान दिलं होतं.

हे वाचलं का?

दोघांमध्ये पहिला डाव मंगळवारी खेळवला गेला होता. यामध्ये 34 चालींपर्यंत हा सामना गेला होता. त्यामुळे हा सामना बरोबरीत सुटला होता. त्यानंतर दुसरा सामना बुधवारी खेळवण्यात आला. हा सामना देखील 30 चालींपर्यंत गेला आणि बरोबरीत सुटला होता. प्रज्ञानंदने मॅग्नस कार्लसनला तगडी टक्कर दिली होती. दोन्ही सामने बरोबरीत सुटल्याने टाय ब्रेकर सामन्यापर्यंत हा सामना पोहोचला होता.या सामन्यात 4 गेमनंतर निकाल समोर आला आहे. आणि हा सामना मॅग्नस कार्लसन जिंकून फिडे वर्ल्ड कप चेस टुर्नामेंटवर नाव कोरले आहे. तर प्रज्ञाननांदा हा उपविजेता ठरला.

हे ही वाचा : Odi world cup 2023: वनडे वर्ल्ड कपसाठी स्टार क्रिकेटरकडून निवृत्ती जाहीर

 

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT