IPL 2024 : रोहित शर्मा प्रचंड भडकला, ब्रॉडकास्टरलाच सुनावलं; नेमकं काय घडलं?

मुंबई तक

ADVERTISEMENT

rohit sharma anger on star sports for privacy breach during ipl 2024 mumbai indians team
रोहित शर्माने आयपीएल ब्रॉडकास्टर चॅनेलला कडक शब्दात सुनावले आहे.
social share
google news

Rohit Sharma Video Viral : टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा नुकताच आयपीएलमधून फ्री झाला आहे. कारण त्याची टीम मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) प्लेऑफ पर्यंत पोहोचू शकली नाही. त्यामुळे सध्या तो टी20 वर्ल्ड कप 2024 (T20 World Cup 2024) च्या तयारीला लागला आहे. या दरम्यान रोहित शर्मा (Rohit Sharma) एका चॅनेलवर प्रचंड भडकल्याची घटना घडली आहे. रोहित इतका भडकलाय की त्याने चॅनेलला खडेबोल सुनावले आहे. त्यामुळे नेमकं हे प्रकरण काय आहे? हे जाणून घ्या. (rohit sharma anger on star sports for privacy breach during ipl 2024 mumbai indians team) 

रोहित शर्माने एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक ट्विट केले आहे.या ट्विटमध्ये रोहित शर्माने एका घटनेवर राग व्यक्त केला आहे आणि आयपीएल ब्रॉडकास्टर चॅनेलला कडक शब्दात सुनावले आहे. रोहितने ट्विटमध्ये लिहले की, खेळाडूंच्या आयुष्यातील खाजगी गोष्टी जाहीर केल्या जात आहेत. कॅमेरे तुमचं प्रत्येक बोलणं, हावभाव, कृती टीपते आहे. तुम्ही मित्रांबरोबर घरच्यांबरोबर, संघातील सहकाऱ्याबरोबर, सरावावेळी जे जे बोलता ते टिपलं जातंय. 

हे ही वाचा : "निवडणुकीनंतर तुम्हीच मुख्यमंत्री", भुजबळांना कुणी दिलेली ऑफर?

मी बोलत असताना रेकॉर्ड करू नका असी विनंती करूनही स्टार स्पोर्टसने चित्रीकरण केले. नुसतं चित्रीकरण करून थांबले नाही तर ते प्रसारीत केलं. हा गोपनियतेचा भंग आहे, असे रोहित शर्मा सांगितले आहे. तसेच त्यांना एक्सक्लुझिव्ह कंटेट हवं आहे, व्ह्यूज हवे आहेत. एंगेजमेंट हवी आहे. पण या सगळ्याच्या नादात तुम्ही चाहते, खेळाडू आणि क्रिकेट यांच्यातला विश्वासाचा धागा तोडत आहात. भविष्यात परिस्थिती सुधारेल असे शेवटी रोहित शर्माने म्हटले आहे. 

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

हे ही वाचा : पूनम महाजनांचं तिकीट कापलं, कारण...फडणवीसांनीच सांगितलं काय घडलं?

खरंतर आयपीएलच्या दरम्यान रोहित शर्माचे अनेक व्हिडिओ व्हायरल झाले होते. या व्हिडिओवरूनच रोहित शर्माने नाराजी व्यक्त केल्याचे समजते आहे. 

    follow whatsapp

    ADVERTISEMENT