Shreyas Iyer पाठीच्या दुखापतीमुळे त्रस्त; IPL मध्ये खेळणार का?

मुंबई तक

Shreyas Iyer injured : भारताचा मधल्या फळीतील फलंदाज श्रेयस अय्यर दुखापतीमुळे (Injury) दीर्घकाळ क्रिकेटच्या मैदानापासून दूर राहू शकतो. अहमदाबादमध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या चौथ्या कसोटीच्या तिसऱ्या दिवशी त्याच्या पाठीला दुखापत झाल्याचं समोर आलं. पाचव्या दिवशी श्रेयस अय्यरला ना फलंदाजी करता आली ना तो क्षेत्ररक्षणासाठी मैदानावर बाहेर आला. (Shreyas Iyer suffering from back injury) आता असे वृत्त आहे […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

Shreyas Iyer injured : भारताचा मधल्या फळीतील फलंदाज श्रेयस अय्यर दुखापतीमुळे (Injury) दीर्घकाळ क्रिकेटच्या मैदानापासून दूर राहू शकतो. अहमदाबादमध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या चौथ्या कसोटीच्या तिसऱ्या दिवशी त्याच्या पाठीला दुखापत झाल्याचं समोर आलं. पाचव्या दिवशी श्रेयस अय्यरला ना फलंदाजी करता आली ना तो क्षेत्ररक्षणासाठी मैदानावर बाहेर आला. (Shreyas Iyer suffering from back injury)

आता असे वृत्त आहे की तो केवळ ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेतूनच नाही तर आयपीएल 2023 च्या सुरुवातीच्या सामन्यांमधूनही बाहेर जाऊ शकतो. जर त्याच्यावर शस्त्रक्रिया करायची असेल तर दोन महिने परत येणे शक्य होणार नाही. अहमदाबाद कसोटीनंतर कर्णधार रोहित शर्माने अय्यरची प्रकृती ठीक नसल्याचे सांगितले होते.

WTCFinal: ओव्हलच्या मैदानाने वाढवली भारताची चिंता, बघा आकडेवारी काय सांगतो?

भारताला आता १७ मार्चपासून ऑस्ट्रेलियाविरुद्ध तीन सामन्यांची वनडे मालिका खेळायची आहे. अय्यर यात खेळू शकणार नाही. तसेच, सध्याच्या परिस्थितीत तो ३१ मार्चपासून सुरू होणाऱ्या आयपीएलच्या सुरुवातीच्या फेऱ्यांमध्ये सहभागी होऊ शकणार नाही. या स्पर्धेत तो कोलकाता नाईट रायडर्सचे नेतृत्व करतो. जानेवारीत अय्यर पहिल्यांदा पाठदुखीशी झुंजताना दिसला होता. त्यानंतर त्याला न्यूझीलंडविरुद्धची वनडे आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धची पहिली कसोटी सोडावी लागली.

हे वाचलं का?

    follow whatsapp