मराठमोळ्या क्रिकेटपटूच्या आयुष्यावर येतोय चित्रपट; श्रेयस तळपदे साकारणार प्रमुख भूमिका

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

अभिनेता श्रेयस तळपदे सध्या चांगलाच चर्चेत आहे. पुष्पा सिनेमाच्या हिंदी रिमेकला श्रेयसने अल्लु अर्जुनला दिलेला आवाज, झी मराठी वाहिनीवरील माझी तुझी रेशीमगाठ ही त्याची गाजत असलेली मालिका यामुळे श्रेयसचे अच्छे दिन सुरु आहेत. याचदरम्यान श्रेयस आणखी एका बॉलिवू़ड चित्रपटात चमकणार आहे. हा सिनेमा एका मराठमोळ्या क्रिकेटपटूच्या आयुष्यावर असून श्रेयस यात मुख्य भूमिकेत आहे.

ADVERTISEMENT

मुंबईकर क्रिकेटपटू आणि आयपीएलमध्ये वयाच्या चाळीशीत पदार्पण करणाऱ्या प्रवीण तांबेच्या आयुष्यावर एक चित्रपट येतो आहे. कौन प्रवीण तांबे असं या सिनेमाचं नाव असून श्रेयस तळपदे या सिनेमात प्रमुख भूमिका बजावतो आहे. श्रेयसने आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन या सिनेमाचं पोस्टर जाहीर केलं असून ९ मार्चला या सिनेमाचा ट्रेलर येणार आहे.

हे वाचलं का?

दरम्यान, हा चित्रपट १ एप्रिल रोजी डिस्नी प्लस हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. श्रेयसने या आधी २००५ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘इक्बाल’ या चित्रपटात त्याच्या अभिनयाने छाप सोडली आहे. जवळपास १७ वर्षांनंतर तो पुन्हा एकदा क्रिकेटपटूच्या भूमिकेत दिसणार आहे. चित्रपटात श्रेयससोबत आशिष विद्यार्थी, परम्ब्रता चॅटर्जी आणि अंजली पाटील यांच्या मुख्य भूमिका आहेत. जयप्रद देसाई यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT