आम्ही अजुनही ‘कोहिनूर’ची वाट पाहतो आहे! जेव्हा गावसकर ब्रिटीश कॉमेंट्रेटरची फिरकी घेतात
भारतीय संघाचे माजी कर्णधार सुनील गावसकर हे निवृत्तीनंतर कॉमेंट्रीकडे वळले आहेत. अनेकदा कॉमेंट्रीदरम्यान गावसकर आपल्या बहारदार शैलीने धमाल उडवून देत असतात. आयपीएलच्या पंधराव्या हंगामादरम्यान गावसकरांच्या याच शैलीचा प्रत्यय क्रिकेटप्रेमींना पहायला मिळाला. लखनऊ सुपरजाएंट विरुद्ध राजस्थान रॉयल्स हा सामना मुंबईत सुरु होता. सामन्यादरम्यान टीव्ही कॅमेरा क्रू ने रात्री मुंबईचं दिसणारं सौंदर्य आपल्या कॅमेऱ्यात कैद केलं. रात्रीच्या […]
ADVERTISEMENT
भारतीय संघाचे माजी कर्णधार सुनील गावसकर हे निवृत्तीनंतर कॉमेंट्रीकडे वळले आहेत. अनेकदा कॉमेंट्रीदरम्यान गावसकर आपल्या बहारदार शैलीने धमाल उडवून देत असतात. आयपीएलच्या पंधराव्या हंगामादरम्यान गावसकरांच्या याच शैलीचा प्रत्यय क्रिकेटप्रेमींना पहायला मिळाला.
ADVERTISEMENT
लखनऊ सुपरजाएंट विरुद्ध राजस्थान रॉयल्स हा सामना मुंबईत सुरु होता. सामन्यादरम्यान टीव्ही कॅमेरा क्रू ने रात्री मुंबईचं दिसणारं सौंदर्य आपल्या कॅमेऱ्यात कैद केलं. रात्रीच्या दिवशी मरीन ड्राईव्ह परिसरात दिसणारं विहंगम दृष्य पाहताना गावसकरांनी त्याची तुलना राणीच्या हाराशी (Queens Neck less) शी केली. यावेळी गावसकरांनी आपल्या सोबत बसलेले सहकारी ब्रिटीश कॉमेंट्रेटर Alan Wilkins यांची फिरकी घेत, आम्ही अजुनही कोहिनूर हिऱ्याची वाट पाहत आहोत असं वक्तव्य केलं. पाहा काय म्हणाले गावसकर….
#SunnyGavaskar demands the Kohinoor ? pic.twitter.com/TyE95ZqNFT
— Mohit Dinodia (@MohitDinodia) April 10, 2022
गावसकरांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांच्याही यावर चांगल्याच प्रतिक्रीया आलेल्या पहायला मिळाल्या.
हे वाचलं का?
Sunil Gavaskar just asked fellow commentator @alanwilkins22 to return the Kohinoor. “If you have any influence, maybe you can ask the Queen to return it.”
???
Gavaskar Sir ko Bharat Ratna when?
— Siddharth's Echelon (@SiddharthKG7) April 10, 2022
Sunil Gavaskar ribbing Alan Wilkins about the British taking away the Kohinoor after Wilkins made a comment about Marine Drive being called the Queen’s Necklace is GOLD! #TATAIPL2022
— Aniruddha Guha (@AniGuha) April 10, 2022
Oh LORD!
Sunil Gavaskar just did it!!
He asked Alan Wilkins to wiggle around his influence all the way up to the royalty in order secure the Kohinoor back for India while commentating live on TV in front of the millions. Casually!An Absolute Gem! #IPL2022 #LSGvsRR
— Adam Rego ֎ (@mindfulprostate) April 10, 2022
दरम्यान राजस्थान आणि लखनऊ या दोन संघांमध्ये शेवटच्या क्षणापर्यंत रंगलेल्या सामन्यात राजस्थानने 3 रन्सनी बाजी मारली. लखनऊकडून मार्कस स्टॉयनिसने फटकेबाजी करुन सामन्यात रंगत आणली होती. परंतू त्याचे प्रयत्न तोकडेच पडले.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT