T20 World Cup : सेमी फायनलसाठी टीम इंडिया अजुनही शर्यतीत, ही आहेत समीकरणं
पाकिस्तान पाठोपाठ टीम इंडियाला टी-२० विश्वचषकामध्ये सलग दुसऱ्या सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला. न्यूझीलंडने भारताला ८ विकेटने हरवत स्पर्धेतलं आपलं आव्हान कायम राखलं आहे. न्यूझीलंडच्या बॉलर्सनी भारतीय फलंदाजांवर अंकुश लावत त्यांना ११० धावांवर रोखलं. सलग दुसऱ्या पराभवामुळे टीम इंडियाचं सेमी फायनलमधलं आव्हान आता धोक्यात आलं आहे. परंतू अद्यापही भारताचं आव्हान संपुष्टात आलेलं नाही. सेमी फायनलमध्ये […]
ADVERTISEMENT

पाकिस्तान पाठोपाठ टीम इंडियाला टी-२० विश्वचषकामध्ये सलग दुसऱ्या सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला. न्यूझीलंडने भारताला ८ विकेटने हरवत स्पर्धेतलं आपलं आव्हान कायम राखलं आहे. न्यूझीलंडच्या बॉलर्सनी भारतीय फलंदाजांवर अंकुश लावत त्यांना ११० धावांवर रोखलं. सलग दुसऱ्या पराभवामुळे टीम इंडियाचं सेमी फायनलमधलं आव्हान आता धोक्यात आलं आहे.
परंतू अद्यापही भारताचं आव्हान संपुष्टात आलेलं नाही. सेमी फायनलमध्ये प्रवेश करण्यासाठी भारताला पुढील ३ सामन्यांमध्ये मोठा विजय मिळवणं गरजेचं झालं आहे. याचसोबत अफगाणिस्तानने न्यूझीलंडला हरवल्यास भारताला सेमी फायनलमध्ये संधी मिळू शकते.
पाकिस्तानने 3 सामन्यांत 3 विजय मिळवले असून ते सध्या 6 गुणांसह प्वाइंट्स टेबलमध्ये अव्वल स्थानावर आहेत. पाकिस्तानने सेमीफायनल मधील आपले स्थान जवळपास पक्के केले आहे. आता त्याला स्कॉटलंड आणि नामिबियाविरुद्ध खेळायचे आहे. या दोघांविरुद्ध पाकिस्तान सहज विजय मिळवू शकतो. म्हणजेच आता सेमीफाइनलसाठी ग्रुप 2 मध्ये फक्त 1 स्थान शिल्लक आहे.
T20 WC, Ind Vs NZ: सलग दुसऱ्या पराभवामुळे भारताचं आव्हान धोक्यात