IND vs NZ : "फक्त त्याच खेळाडूंना..."; भारताच्या प्लेईंग XI बाबत कोच गौतम गंभीर 'हे' काय बोलून गेला

मुंबई तक

Gautam Gambhir On Team India Playing XI : भारत आणि न्यूझीलंड यांच्यात तीन कसोटी सामन्यांची मालिका बुधवारी 16 ऑक्टोबरपासून रंगणार आहे. हा सामना बंगळुरुच्या चिन्नास्वामी स्टेडियममध्ये खेळवण्यात येणार आहे.

ADVERTISEMENT

India vs New Zealand 1st Test
Gautam Gambhir Press Conference
social share
google news

बातम्या हायलाइट

point

भारत विरुद्ध न्यूझीलंडचा पहिला कसोटी सामना चिन्नास्वामी स्टेडियममध्ये रंगणार

point

टीम इंडियाचा प्रशिक्षक गौतम गंभीर प्लेईंग 11 बाबात नेमकं काय म्हणाला?

point

न्यूझीलंडचा फलंदाज रचिन रविंद्रची खेळपट्टीबाबत मोठी प्रतिक्रिया

Gautam Gambhir On Team India Playing XI : भारत आणि न्यूझीलंड यांच्यात तीन कसोटी सामन्यांची मालिका बुधवारी 16 ऑक्टोबरपासून रंगणार आहे. हा सामना बंगळुरुच्या चिन्नास्वामी स्टेडियममध्ये खेळवण्यात येणार आहे. परंतु, या सामन्यात पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे सामना रद्दही होऊ शकतो. तत्पूर्वी, टीम इंडियाचा प्रशिक्षक गौतम गंभीरने टीम इंडियाच्या प्लेईंग इलेव्हनबाबात मोठं विधान केलं आहे. न्यूझीलंड विरुद्ध होणाऱ्या पहिल्या कसोटी सामन्यात टीम इंडियाच्या प्लेईंग 11 मध्ये कोणत्या खेळाडूंचा समावेश होऊ शकतो, याविषयी गंभीरने मोठी प्रतिक्रिया दिली आहे.

गौतम गंभीर माध्यमांशी बोलताना काय म्हणाला?

"हा सामना परिस्थिती, खेळपट्टी आणि विपक्षी संघाच्या भूमिकेवर अवलंबून आहे. आमच्याकडे सर्व स्तरावर खेळलेले खेळाडू आहेत, ही ड्रेसिंग रुमची सर्वात चांगली गोष्ट आहे. आम्ही या खेळाडूंपैकी कुणाचीही निवड करू शकतो. ते आमच्यासाठी चांगली कामगिरी करू शकतात, हे आम्हाला माहिती आहे. आम्ही खेळपट्टी पाहणार आहोत.

हे ही वाचा >> Assembly Election 2024 : महाराष्ट्रासह 'या' राज्याच्या निवडणुकीचं बिगुल वाजणार! आज निवडणूक आयोग तारखा करणार जाहीर

चिन्नास्वामी स्टेडियमध्ये चांगलं खेळण्यासाठी चांगली रणनीती काय असू शकते, यावर आम्ही चर्चा करणार आहोत. आमच्याकडे खूप चांगले गोलंदाज आहेत. फक्त कुलदीप यादवच नाही, तर आमच्याकडे संघात आणखी चांगले गोलंदाज आहेत. मी याआधीही म्हटलं आहे की, आम्ही कुणालाही प्लॅनपासून दूर ठेवत नाही. आमच्यासाठी जे काम करू शकतात, त्याच खेळाडूंची निवड आम्ही करतो", अशी प्रतिक्रिया गौतम गंभीरने दिली आहे.

खेळपट्टीबाबत रचिन रविंद्रची मोठी प्रतिक्रिया

न्यूझीलंडचा आक्रमक फलंदाज रचिन रविंद्रने बंगुळुरुच्या खेळपट्टीबाबत मोठं विधान केलं आहे. तो म्हणाला, बंगळुरुची खेळपट्टी कमी टर्नची आहे. या खेळपट्टीवर वेगवान गोलंदाजांना विकेट घेताना तुम्ही पाहू शकता. मुंबईत जेव्हढा टर्न असतो, तेव्हढा या खेळपट्टीवर नसेल, असं वाटतं. पहिल्या, दुसऱ्या दिवशी चेंडू टर्न होणार नाही. पण तिसऱ्या, चौथ्या आणि पाचव्या दिवशी टर्न होऊ शकतो. 

हे वाचलं का?

    follow whatsapp