World Cup 2023: अवघे काही दिवसच शिल्लक, टीम इंडियासमोर आव्हानांचा डोंगर?

प्रशांत गोमाणे

ADVERTISEMENT

ODI team india world Cup 2023 analysis opening and middle order rohit sharma rahul dravid
ODI team india world Cup 2023 analysis opening and middle order rohit sharma rahul dravid
social share
google news

Indias preparation for Odi World Cup 2023: येत्या 5 ऑक्टोबरपासून भारतात वनडे वर्ल्ड कपला सुरुवात होणार आहे. या वर्ल्ड कपसाठी आता अवघे 57 दिवस उरले आहेत. या दिवसात भारताला आपली सर्वात बेस्ट प्लेईंग इलेव्हन मैदानात उतरवायची आहे. त्या दृष्टीने टीम मॅनेजमेंट अनेक धडाकेबाज निर्णय घेत आहे. मात्र दोन महिने उरले असताना देखील टीम इंडियाकडे अद्याप त्यांची बेस्ट प्लेईंग इलेव्हन नाही आहे. अशा अवस्थेत टीम इंडिया आता कशी वर्ल्ड कप जिंकणार आहे? असा प्रश्न क्रिडाप्रेमींना पडला आहे. (team india world Cup 2023 analysis opening and middle order rohit sharma rahul dravid)

दुबळया वेस्ट इंडिज विरूद्ध पराभव

कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली आणि कोच राहुल द्रविड यांच्या प्रशिक्षणाखाली खेळत असलेल्या टीम इंडियात अनेक समस्या आहेत. अनेक नवीन पर्यायासह खेळण्याचा प्रयत्न होतो आहे, मात्र हे प्रयत्न अपयशी ठरताना दिसत आहेत.

टीम इंडियाने नुकतीच वेस्ट इंडिज विरूद्ध तीन सामन्यांची वनडे मालिका खेळली.या मालिकेत टीम इंडियाने 2-1 ने मालिका खिशात घातली होती. खरं तर वेस्ट इंडिज विरूद्ध तीनही वनडे सामने टीम इंडियाने जिंकणे वर्ल्ड कपच्या दृष्टीकोनातून महत्वाचे होते. मात्र एका सामन्यात टीम इंडियाचा पराभव झाला. त्यात वेस्ट इंडिज ही यंदाच्या वर्ल्ड कपसाठी क्वालिफाय देखील झाली नाही. अशा अवस्थेत दुबळ्या संघाविरूद्धचा पराभव ही टीम इंडियासाठी चांगली लक्षणे नाही आहेत.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

हे ही वाचा : ODI WC 2023: भारत-पाक सामन्याची तारीख बदलली, ‘या’ दिवशी रंगणार हायव्होल्टेज सामना

ओपनिंग जोडीवर संभ्रम

एक्सपेरीमेंट म्हणून विराट कोहली आणि रोहित शर्माला दोन सामने बाहेर बसवले होते. या दरम्यान शुभमन गिल आणि ईशान किशनने ओपनिंग केली होती. त्यामुळे या दोघांपैकी एका खेळाडूला रोहित सोबत आगामी सामन्यात सलामीला उतरवले जाण्याची शक्यता आहे. किंवा दोघांची जागा कायम ठेवून रोहितला मिडल ऑर्डरला उतरवण्याची तयारी सुरु आहे. टीम इंडियासमोर एशिया कपची स्पर्धा देखील आहे. तत्पुर्वी टीम इंडियाला ही समस्या सोडवावी लागणार आहे.

मिडल ऑर्डर कोण सांभाळणार?

जर टीम इंडियाचा टॉप ऑर्डर फ्लॉप ठरला तर मिडल ऑर्डरमध्ये विराट कोहली, श्रेयस अय्यर, हार्दिक पंड्या, ईशान किशन सारखे खेळाडूंवर जबाबदारी असणार आहे. संजु सॅमसन देखील मिडल ऑर्डरमध्ये दिसू शकतो.

ADVERTISEMENT

गोलंदाजीची कमान कोण सांभाळणार?

टीम इंडियाचा अनुभवी आणि स्टार गोलंदाज जसप्रीत बुमराह दुखापतीतून सावरत मैदानात वापसी करणार आहे. बुमराह आयर्लंड विरूद्ध सामन्यात दिसणार आहे. बुमराह सोबत मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराज हे वेगवान गोलंदाजीची कमान सांभाळणार आहेत. हार्दिक पंड्या देखील त्यांना चौथा पर्याय असणार आहे. हार्दिकसोबत शार्दुल ठाकून देखील पर्यायी गोलंदाज असणार आहे. स्पिनर गोलंदाजीची जबाबदारी रविंद्र जडेजा, कुलदीप यादव, युझवेंद्र चहलवर असणार आहे.

ADVERTISEMENT

हे ही वाचा : Video : प्रेमाने मिठी मारली,गालावर किस, ‘विराट’च्या भेटीने WI क्रिकेटपटूची आई भारावली

वर्ल्ड कपसाठी संभाव्य टीम

ओपनर : रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गील
मिडल ऑर्डर : विराट कोहली, श्रेयस अय्यर, सुर्यकुमार यादव/ के एल राहुल
विकेटकीपर : ईशान किशन आणि संजू सॅमसन
ऑलराऊंडर : हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा
फास्ट बॉ़लर : मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, जसप्रीत बुमराह, शार्दुल ठाकुर
स्पिनर्स : कुलदीप यादल आणि युझवेंद्र चहल

बीसीसीआय वर्ल्ड कपसाठी 18 सदस्यीय कोर टीमची घोषणा 5 सप्टेंबरला करणार आहे. पण आयसीसीच्या नियमानूसार 28 सप्टेंबरला सर्व देशातील संघाना टीमची घोषणा करावी लागणार आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT