IND vs ENG: पदार्पण सामन्यातच वरुण चक्रवर्तीने रचला इतिहास! 'अशी' कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय

मुंबई तक

Varun Chakravarthy, IND vs ENG:  टीम इंडियाचा स्टार स्पिनर वरुण चक्रवर्तीने भारत विरुद्ध इंग्लंड दुसऱ्या वनडे सामन्यात इतिहास रचला. वरुणने पदार्पण सामन्यातच चमकदार कामगिरी केलीय.

ADVERTISEMENT

Varun Chakravarthy, IND vs ENG
Varun Chakravarthy, IND vs ENG
social share
google news

बातम्या हायलाइट

point

वरुण चक्रवर्तीने पदार्पण सामन्यातच रचला इतिहास

point

18 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 33 विकेट्स घेण्याची कामगिरी

point

टीम इंडियाच्या प्लेईंग इलेव्हनमध्ये दोन मोठे बदल

Varun Chakravarthy, IND vs ENG:  टीम इंडियाचा स्टार स्पिनर वरुण चक्रवर्तीने भारत विरुद्ध इंग्लंड दुसऱ्या वनडे सामन्यात इतिहास रचला. वरुणने पदार्पण सामन्यातच चमकदार कामगिरी केलीय. वरुणला या दुसऱ्या वनडे सामन्यात संधी मिळाली. भारतीय संघाच्या प्लेईंग इलेव्हनमध्ये सामील होताच वरुणने ऐतिहासिक कामगिरी केलीय. या सामन्यासाठी टीम इंडियाच्या प्लेईंग इलेव्हनमध्ये दोन मोठे बदल करण्यात आले. यशस्वी जैस्वालच्या जागेवर विराट कोहलीली संधी मिळाली. तर कुलदीप यादवच्या जागेवर वरुण चक्रवर्तीला पदार्पण करण्याची संधी मिळाली.

वरुण क्रिकेटच्या इतिहासात दुसरा भारतीय ठरला

याआधी इंग्लंड विरुद्ध झालेल्या पाच टी-20 सामन्यांच्या सीरिजमध्ये 14 विकेट्स घेतल्यानं वरुणला वनडे टीममध्ये सामील केलं गेलं. आता वनडेत पदार्पण करण्याची संधी मिळताच वरुणने इतिहास रचला. वरुणने आतापर्यंत 18 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 33 विकेट्स घेण्याची कामगिरी केली. 33 वर्ष 103 दिवस वय असताना वरुण चक्रवर्तीने टीम इंडियासाठी वनडे सामन्यात पदार्पण केलं आणि याचसोबत भारतीय संघासाठी 1974 नंतर वनडे फॉर्मेटमध्ये पदार्पण करणारा टीम इंडियाचा पहिला खेळाडू बनला आहे. भारतासाठी 36 वर्ष 138 दिवस इतक्या वयात विकेटकीपर फलंदाज फारुख इंजीनियरने 1974 मध्ये इंग्लंड विरुद्ध लीड्सच्या मैदानात डेब्यू केलं होतं. त्यानंतर आता वरुण चक्रवर्तीचा नाव जोडलं गेलं आहे. वरुण अशी कामगिरी करणारा भारतीय इतिहासात दुसरा क्रिकेटर बनला आहे.

हे ही वाचा >> Suraj Chavan: "...तरच धनंजय मुंडे यांच्यावर कारवाई होईल", संतोष देशमुख हत्याप्रकरणी सूरज चव्हाण यांचं मोठं विधान!

अजित वाडेकरला टाकलं मागे

वरुण चक्रवर्तीच्या आधी हा विक्रम 33 वर्ष 103 दिवस वयात भारतासाठी वनडेत पदार्पण करणारे अजीत वाडेकर यांच्या नावावर होता. आता त्यांची नोंद या लिस्टमध्ये तिसऱ्या क्रमांकावर झाली आहे. या लिस्टमध्ये चौथ्या स्थानावर दिलीप दोषी यांची नोंद आहे. ज्यांनी भारतासाठी 32 वर्ष 350 दिवस इतक्या वयात ऑस्ट्रेलिया विरोधात मेलबर्नमध्ये 1980 मध्ये पदार्पण केलं होतं. तर पाचव्या स्थानावर सैयद आबीद अली यांच्या नावाची नोंद आहे.

हे ही वाचा >> Suresh Dhas : धनंजय मुंडे मंत्रिपदाचा राजीनामा कधी देणार? सुरेश धस म्हणाले, "अजितदादा, प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे..."

हे वाचलं का?

    follow whatsapp