Virat ची मुलगी पहिल्यांदाच जगासमोर, हाफ सेंच्युरीनंतर कोहलीचं खास सेलिब्रेशन पाहिलंत का?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातला अखेरचा वन-डे सामना केप टाऊनच्या मैदानावर खेळवला जात आहे. भारताने वन-डे मालिका याआधीच गमावली असली तरीही एका कारणासाठी हा सामना क्रिकेट प्रेमींच्या चांगलाच लक्षात राहणार आहे. भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहलीला या सामन्यात सूर गवसला. याचसोबत अर्धशतकी खेळी केल्यानंतर विराटने पहिल्यांदाच आपली मुलगी वामिकाच्या साथीने सेलिब्रेट केलं.

ADVERTISEMENT

वामिकाचा जन्म झाल्यापासून विराट आणि अनुष्का तिला मीडियाच्या कॅमेऱ्यापासून लांब ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. प्रत्येक दौऱ्यावर जात असताना विराटने फोटोग्राफर्सना बाळाचे फोटो काढू नका अशी विनंतीही केली होती. परंतू आज पहिल्यांदाच केप टाऊनच्या मैदानावर आई अनुष्कासोबत सामना पहायला आलेल्या वामिकाचं जगाला दर्शन झालं.

विराटला कारणे दाखवा नोटीस? गांगुलीने फेटाळलं ‘ते’ वृत्त

हे वाचलं का?

विराटची हाफ सेंच्युरी झाल्यानंतर अनुष्काच्या कडेवर असलेल्या वामिकाचं बाबाचं यश सेलिब्रेट केलं. विराटनेही वामिकाच्या दिशेने एक खास पोज करत आपलं अर्धशतक लाडक्या मुलीला समर्पित केलं. पाहा हा व्हिडीओ….

परंतू विराटची ही खेळी फारकाळ लांबली नाही. केशव महाराजच्या बॉलिंगवर विराट ६५ धावा काढून माघारी परतला. विराटने ८४ बॉलमध्ये ५ चौकार लगावत भारताच्या डावाला स्थैर्य दिलं. शिखर धवननेही ६१ धावांची खेळी करुन विराटला उत्तम साथ दिली.

ADVERTISEMENT

कॅप्टन्सी गेल्यानंतरही Virat ची आक्रमकता कायम, आफ्रिकन कॅप्टनशी घेतला पंगा; पाहा व्हिडीओ

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT