Virat Kohli : सामना सुरू असतानाच मैदानात घुसला अन् कोहलीला पकडले
Virat Kohli fan breaches security : जानेवारीमध्येही अशीच घटना घडली होती. अफगाणिस्तानविरुद्धच्या टी-20 सामन्यादरम्यान एक चाहता मैदानात घुसला होता.
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
आयपीएल सामन्यात सुरक्षेत मोठी चूक
चाहत्याने सुरक्षा भेदून कोहलीला पकडले
सामन्यातील व्हिडीओ झाला व्हायरल
Virat Kohli fan breaches security : इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2024 हंगामातील सहावा सामना सोमवारी (25 मार्च) रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) आणि पंजाब किंग्स (PBKS) यांच्यात खेळला गेला. आरसीबीने हा सामना 4 गडी राखून जिंकला, मात्र या सामन्यात सुरक्षेबद्दल एक मोठी चूक झाली.
ADVERTISEMENT
सामन्यात पंजाब किंग्जने 177 धावांचे लक्ष्य दिले होते, ज्याच्या प्रत्युत्तरात आरसीबीने 6 विकेट्स गमावून सामना जिंकला. या सामन्यात विराट कोहलीने 49 चेंडूत सर्वाधिक 77 धावांची खेळी केली. कोहली फलंदाजी करत असताना सुरक्षा भेदून घुसखोरी केल्याची विचित्र घटना घडली.
मैदानात घुसला अन् कोहलीला पकडले
अचानक एक चाहता मैदानात घुसला. तो थेट कोहलीकडे गेला आणि त्याच्या पाया पडला. त्या चाहत्याने कोहलीच्या पायाला स्पर्श केला. सुरक्षारक्षकही त्याच्या मागे धावत आले. एका रक्षकाने त्या चाहत्याला पकडले, पण त्यानंतर त्या चाहत्याने कोहलीलाच पकडले.
हे वाचलं का?
हेही वाचा >> आयपीएलची फायनल कधी आणि कुठे होणार?
तेवढ्यात मागून दुसरा सुरक्षा रक्षक आला आणि त्याने चाहत्याला पकडून बाहेर नेले. आयपीएल आणि खेळाडूंच्या सुरक्षेतील ही गंभीर चूक झाली घडली. आयपीएल किंवा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सुरक्षेतील त्रुटी उघडकीस येण्याची ही पहिलीच वेळ नाही.
जानेवारीमध्ये घडली होती अशीच घटना
या वर्षी जानेवारीमध्ये अफगाणिस्तानविरुद्धच्या दुसऱ्या टी-20 सामन्यादरम्यान एक चाहता मैदानात घुसला होता. त्यावेळी त्या चाहत्याने कोहलीला मिठी मारली होती. त्यावेळी कोहली क्षेत्ररक्षण करत होता. या मालिकेत कोहलीने 14 महिन्यांनंतर टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन केले.
ADVERTISEMENT
आरसीबीने केला पंजाबचा पराभव
आयपीएल 2024 च्या या सहाव्या सामन्यात पंजाब संघाने नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना 6 गडी बाद 176 धावा केल्या. संघाकडून कर्णधार धवनने 37 चेंडूत सर्वाधिक 45 धावा केल्या.
ADVERTISEMENT
जितेश शर्माने 27, प्रभसिमरन सिंगने 25 आणि सॅम कुरनने 23 धावा केल्या. तर आरसीबीकडून मोहम्मद सिराज आणि ग्लेन मॅक्सवेल यांनी २-२ बळी घेतले.
हेही वाचा >> घराणेशाही, राजकीय समीकरणे! 'या' जागा महायुती-मविआसाठी डोकेदुखी का ठरल्यात?
177 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना आरसीबीने 19.2 षटकांत 6 गडी गमावून सामना जिंकला. संघासाठी कोहलीने 49 चेंडूत सर्वाधिक 77 धावांची खेळी खेळली. तर दिनेश कार्तिकने २८ धावांची नाबाद आणि महिपाल लोमराने १७ धावांची नाबाद खेळी खेळली. पंजाब संघाकडून कागिसो रबाडा आणि हरप्रीत ब्रार यांनी 2-2 बळी घेतले.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT