IPL 2023 : आरसीबी आयपीएलमधून बाहेर… विराट कोहलीने अखेर सोडलं मौन

मुंबई तक

गुजरात टायटन्सविरुद्ध पराभव झाल्यानंतर आरसीबीचा संघ आयपीएलमधून बाहेर पडला. आरसीबीच्या पराभवानंतर विराट कोहलीने पहिल्यांदाच ट्विट केलं आहे.

ADVERTISEMENT

RCB out from ipl 2023 virat kohli shares hearfelt post
RCB out from ipl 2023 virat kohli shares hearfelt post
social share
google news

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा (RCB) संघ इंडियन प्रीमियर लीग (IPL) मधून बाहेर पडला. अटीतटीच्या सामन्यात आरसीबीचा पराभव झाल्यानंतर खेळाडूंसह चाहत्यांमध्ये काहीसं निराशेचं वातावरण निर्माण झालं होतं. संघाच्या पराभवानंतर माजी कर्णधार विराट कोहलीनेही बोलणं टाळलं होतं. अखेर कोहलीने प्रतिक्रिया दिली आहे. बंगळुरूचा संघ आयपीएलचा सर्वात बलाढ्य संघ म्हणून ओळखला जात होता आणि यावेळी हा संघ विजेतेपदावर कब्जा करू शकेल, असे मानले जात होते. पण तसे होऊ शकले नाही आणि आरसीबीच्या चाहत्यांचे स्वप्न भंगले. कोहली अँड कंपनीसाठी आतापर्यंत 16 हंगाम झाले आहेत, यात एकदाही ट्रॉफी जिंकता आलेली नाही.

गुजरात टायटन्स संघाने अंतिम साखळी सामन्यात बंगळुरूचा पराभव केला आणि स्पर्धेतून बाहेर फेकला गेला. यावर विराटने आपली प्रतिक्रिया दिली आहे. पराभवानंतर विराटने आरसीबीच्या संघाचे फोटो ट्विटरवर शेअर केले आहेत.

हेही वाचा >> Jayant Patil, IL&FS scam : नऊ तास चौकशी, पण ईडीने पाटलांना कोणते प्रश्न विचारले?

विराट कोहलीने 23 मे रोजी शेअर केलेल्या आपल्या ट्विटमध्ये लिहिले की, या हंगामात असे काही क्षण होते जे कधीच विसरता येणार नाहीत, परंतु आम्ही आमच्या ध्येयापूर्वी थोडे चुकलो. निराश नक्कीच झालो आहोत परंतु आपली उंच ठेवली पाहिजे.

आरसीबीच्या सर्व निष्ठावंत समर्थकांचा मी ऋणी आहे. मी माझा संघ, प्रशिक्षक, व्यवस्थापन आणि सहकारी खेळाडूंचे आभार मानू इच्छितो. पुढच्या वेळी आणखी मजबूतीने येण्याचे आमचे ध्येय आहे, असं विराट कोहलीने म्हटलं आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp