WTC Final : चौथ्या दिवसाचा खेळ पावसामुळे वाया, Ind vs NZ सामना अनिर्णित अवस्थेकडे

मुंबई तक

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातला वर्ल्ड टेस्ट चॅम्पिअनशीपचा अंतिम सामना आता अनिर्णित अवस्थेकडे झुकत चालला आहे. चौथ्या दिवसाचा खेळही पावसामुळे रद्द करण्यात आला आहे. साऊदम्प्टनच्या मैदानावर आज सकाळपासून पावसाने हजेरी लावली होती. पहिल्या सत्राचा खेळ वाया गेल्यानंतरही पावसाने उसंत घेतली नाही, त्यानंतर सामनाधिकारी आणि अंपायर्सनी आजच्या दिवसाचा खेळ रद्द केला. Update: Play on Day 4 abandoned […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातला वर्ल्ड टेस्ट चॅम्पिअनशीपचा अंतिम सामना आता अनिर्णित अवस्थेकडे झुकत चालला आहे. चौथ्या दिवसाचा खेळही पावसामुळे रद्द करण्यात आला आहे. साऊदम्प्टनच्या मैदानावर आज सकाळपासून पावसाने हजेरी लावली होती. पहिल्या सत्राचा खेळ वाया गेल्यानंतरही पावसाने उसंत घेतली नाही, त्यानंतर सामनाधिकारी आणि अंपायर्सनी आजच्या दिवसाचा खेळ रद्द केला.

आतापर्यं ४ दिवसांपैकी दोन दिवसांचा खेळ हा पावसामुळे वाया गेला आहे. आयसीसीने या सामन्यासाठी रिजर्व्ह डे ची घोषणा केली आहे. परंतू साऊदम्प्टनच्या मैदानावर पुढचे दोन दिवस पाऊस आणि ढगाळ वातावरणाचा अंदाज वर्तवण्यात आला असल्यामुळे हा सामना अनिर्णित अवस्थेत सुटणार असा अंदाज बांधला जात आहे.

वर्ल्ड टेस्ट चॅम्पिअनशीपसारख्या महत्वाच्या स्पर्धेसाठी आयसीसीने मोठी तयारी केली होती. गेल्या दोन वर्षांपासून आयसीसी विविध देशांमध्ये ही स्पर्धा खेळवत आहे. परंतू अंतिम सामन्यासाठी निवडण्यात आलेल्या ठिकाणावरुन आता आयसीसीला टीकेचा धनी व्हावं लागत आहे. दोन दिवसांचा खेळ वाया गेल्यामुळे क्रिकेटप्रेमींची चांगलीच निराशा झाली आहे. सामना अनिर्णित राहिल्यास पहिल्या-वहिल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पिअनशीपचं विजेतेपद हे दोन्ही संघांमध्ये विभागून दिलं जाणार आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp