WTC सामन्यापुर्वी टीम इंडियाला मोठा धक्का, स्टार खेळाडूला दुखापत
Shardul Thakur Injured : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपपुर्वी टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. कारण टीम इंडियाचा ऑलराऊंड़र शार्दुल ठाकूर (Shardul Thakur) दुखापतग्रस्त झाला आहे.शार्दूल ठाकूर आयपीएलमध्ये दुखापतग्रस्त झाला आहे. आता त्याची दुखापत किती मोठी हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
ADVERTISEMENT
Shardul Thakur Injured : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपपुर्वी टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. कारण टीम इंडियाचा ऑलराऊंड़र शार्दुल ठाकूर (Shardul Thakur) दुखापतग्रस्त झाला आहे.शार्दूल ठाकूर आयपीएलमध्ये दुखापतग्रस्त झाला आहे. आता त्याची दुखापत किती मोठी हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. कारण जर मोठी असली तर त्याला बाहेर बसावे लागेल आणि जर किरकोळ असेल तर त्याला संघात संधी आहे. आजपासून साधारण वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपला (world test championship) महिना आहे. त्यापुर्वी तो दुखापतीतून सावरेल अशी अपेक्षा फॅन्स व्यक्त करतायत. (wtc final 2023 team india all rounder shardul thakur injured)
ADVERTISEMENT
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीमध्ये (world test championship) टीम इंडियाच्या 15 संदस्यीय संघात एकमेव बॉलर ऑलराऊंडर शार्दुल ठाकूरचा (Shardul Thakur) समावेश करण्यात आला होता. मात्र शार्दुल ठाकूर देखील दुखापतग्रस्त झालाय. शार्दुलला (Shardul Thakur) दुखापतीमुळे आयपीएलमध्ये 3 सामन्यात खेळता आले नाही. तसेच चौथ्या सामन्यात शार्दूल गुजरात जायंट्स विरूद्ध तिसऱ्या क्रमांकावर बॅटींगसाठी आला होता. मात्र शार्दुल ठाकूर 4 बॉल खेळून भोपळा न फोडता माघारी परतला होता. आता केकेआरचा पुढील सामना 4 मे रोजी हैद्राबाद विरूद्ध आहे. या सामन्यापुर्वी तो फीट होतो का, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
हे ही वाचा : VIDEO : आयपीएलच्या मैदानात तुफान राडा,फॅन्स आपापसातच भिडले
कधी रंगणार WTC?
वर्ल्ड टेस्ट चॅंम्पियनशिपसाठी (wtc final 2023) निवडले गेलेले खेळाडू अॅशेसच्या पहिल्या दोन टेस्ट सामन्यातही दिसणार आहे.वर्ल्ड टेस्ट चॅंम्पियनशिप 7 ते 11 जून दरम्यान द ओवल मैदानावर खेळवण्यात येणार आहे. तर अॅशेसची सुरुवात 16 जूनपासून होणार आहे.यामध्ये पहिली टेस्ट 16 ते 20 जून दरम्यान एजबेस्टन क्रिकेट मैदानावर रंगणार आहे. तर दुसरा टेस्ट सामना 28 जून ते 2 जूलै दरम्यान लॉर्डस मैदानात खेळवला जाणार आहे.
हे वाचलं का?
WTC साठी दोन्ही संघ
भारतीय संघ : रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिक्य रहाणे, के एल राहूल, के एस भरत (विकेट किपर), रविचंद्रन अश्विन, रविंद्र जडेजा, अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव,जयदेव उनाडकट
हे ही वाचा : अजिंक्य रहाणेचं नशीब फळफळलं, थेट वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपमध्येच संधी
ऑस्ट्रेलियाचा संघ : पॅट कमिन्स कर्णधार, स्कॉट बोलेंड, एलेक्स केरी, कॅमरन ग्रीन, मार्कस हॅरीस, जोश हेजलवूड, ट्रेविस हेड, जोश इंगलिस, उस्मान ख्वाजा, मारनस लाबूशेन, नाथन लायन, मिचेल मार्श, टॉड मर्फी, मॅथ्यू रॅनशो, स्टीव स्मिथ उप कर्णधार, मिचेल स्टार्क,डेविड वॉर्नर
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT