Yashasvi Jaiswal: साडे पाच कोटींच्या घराचा मालक, यशस्वी खरंच विकायचा पाणीपुरी?

रोहिणी ठोंबरे

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

Is Yashasvi Jaiswal really sold Panipuri? : भारतीय क्रिकेटर संघाचा युवा स्टार खेळाडू यशस्वी जयस्वालने (Yashasvi Jaiswal) क्रिकेटच्या मैदानात बाजी मारली आहे. वयाच्या अवघ्या 22 व्या वर्षी त्याने 22 वर्षांचा अनुभव असणाऱ्या जेम्स अँडरसनचा पराभव केला. इंग्लंडविरुद्ध सुरू असलेल्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत सलग दोन द्विशतके झळकावण्यात तो यशस्वी ठरला आहे. यादरम्यान, त्याच्याशी संबंधित आणखी एक मोठी चांगली बातमी समोर आली आहे. यशस्वी जयस्वालने मुंबईत जवळपा 5 कोटी रुपयांचा फ्लॅट खरेदी केला आहे.

यशस्वीने BKC परिसरात 5.38 कोटी रुपयांना एक अपार्टमेंट विकत घेतले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, वांद्रे (पूर्व) इमारतीच्या विंग 3 मधील 1,100 स्क्वेअर फूट फ्लॅटची नोंदणी 7 जानेवारी रोजी झाली होती. 48 हजार 499 रुपये प्रति चौरस फूट दराने हा करार झाला. अनेक दिवसांपासून हा फ्लॅट खरेदी करण्याची चर्चा होती.

यशस्वी जयस्वाल खरंच पाणीपुरी विकायचा?

जेव्हा जेव्हा यशस्वीबद्दलच्या बातम्या येतात तेव्हा एक कॉमन गोष्ट ट्रेंडिंगमध्ये असते. ही गोष्ट म्हणजे पाणीपूरीची. यशस्वी जयस्वाल भारतीय संघात येण्यापूर्वी काही फोटो आणि व्हिडीओ जोरदार व्हायरल झाले होते, ज्यात तो पाणीपूरी विकताना दिसतो. मात्र खरचं तो पाणीपूरी विकायचा का? याबाबत त्याचे प्रशिक्षक ज्वाला सिंग यांनी खुलासा केला आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

त्यांनी सांगितले की, 'यशस्वी जयस्वाल आणि पाणीपुरी विकण्याचा काही एक संबंध नाही. या सर्व बातम्या खोट्या आहेत. याचा त्याच्या खऱ्या आयुष्याशी काही संबंध नाही. हे पाहून मला खुप वाईट वाटतं कारण ही पूर्णपणे खोटी माहिती आहे.' यासह त्यांनी यशस्वी जयस्वालला अशा खोट्या गोष्टींपासून सावध राहण्याचा देखील सल्ला दिला आहे.

तंबूत दिवस काढून दिले स्वप्नांना पंख...
 

यशसवी उत्तर प्रदेशच्या बडोही जिल्ह्यातील रहिवासी आहे. एक काळ असा होता जेव्हा तो स्वप्नांना पंख देण्यासाठी मुंबईला आला त्यावेळी तो आझाद मैदानात तंबूत राहायचा. इतकंच नाही तर, त्याचे प्रशिक्षक ज्वाला सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, 'यशस्वी पाणीपुरी विकणाऱ्या फेरीवाल्यांना एखादवेळेस मदत करायचा. अनेकदा त्याचे ते फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतात आणि तो पाणीपुरी विकायचा असं म्हटलं जातं. पण हे खरं नाही.'

ADVERTISEMENT

'यशस्वी जयस्वाल'ची यशस्वी कामगिरी

राजकोटमधील तिसऱ्या कसोटीत भारताने इंग्लंडविरुद्ध 434 धावांनी दणदणीत विजय मिळवत द्विशतक झळकावले. यावेळी यशस्वीने अनेक विक्रम मोडीत काढले. एका डावात 12 षटकार मारणारा तो जगातील दुसरा आणि भारतातून पहिला क्रिकेटपटू ठरला. 2020 च्या अंडर-19 विश्वचषकापासून यशस्वीचे वर्चस्व आहे. तो राजस्थान रॉयल्सकडून आयपीएल खेळला होता. संघाने त्याला 2.4 कोटी रुपयांना खरेदी केले होते.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT