SA vs IND : Virat Kohli तिसऱ्या कसोटी सामन्यात खेळणार? राहुल द्रविड म्हणतो…

मुंबई तक

दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघाला दक्षिण आफ्रिकेकडून पराभवाचा सामना करावा लागला. कर्णधार डीन एल्गरच्या नाबाद ९६ धावांच्या खेळीच्या जोरावर आफ्रिकेने विजयासाठी मिळालेलं २४० धावांचं आव्हान ७ गडी राखून पूर्ण केलं. या सामन्यात विशेषकरुन चौथ्या दिवसाच्या खेळात भारताला विराट कोहलीची उणीव प्रकर्षाने जाणवली. पाठीला झालेल्या दुखापतीमुळे विराट जोहान्सबर्ग कसोटी सामन्यात खेळू शकला नव्हता. परंतू केप टाऊनमध्ये […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघाला दक्षिण आफ्रिकेकडून पराभवाचा सामना करावा लागला. कर्णधार डीन एल्गरच्या नाबाद ९६ धावांच्या खेळीच्या जोरावर आफ्रिकेने विजयासाठी मिळालेलं २४० धावांचं आव्हान ७ गडी राखून पूर्ण केलं. या सामन्यात विशेषकरुन चौथ्या दिवसाच्या खेळात भारताला विराट कोहलीची उणीव प्रकर्षाने जाणवली. पाठीला झालेल्या दुखापतीमुळे विराट जोहान्सबर्ग कसोटी सामन्यात खेळू शकला नव्हता.

परंतू केप टाऊनमध्ये होणाऱ्या निर्णयाक सामन्यात विराट खेळणार की नाही याबद्दल क्रिकेट चाहत्यांमध्ये चर्चांना उधाण आलं.

SA vs IND : जोहान्सबर्ग कसोटीत आफ्रिकेची बाजी, डीन एल्गरची कर्णधाराला साजेशी खेळी

भारतीय संघाचा प्रशिक्षक राहुल द्रविडने याचं उत्तर दिलं आहे. “तिसऱ्या कसोटीपर्यंत विराट कोहली पूर्णपणे बरा व्हायला हवा. मी नेट्समध्ये त्याला थ्रो-डाऊन करेन आणि यानंतर मला आशा आहे की तो केप टाऊन कसोटीपर्यंत पूर्णपणे फिट होईल. फिजीओसोबत माझं नीट बोलणं झालं नाहीये, परंतू त्याच्या फिटनेसमध्ये सुधारणा होताना दिसते आहे. आपल्याकडे अजुन चार दिवसांचा कालावधी आहे तोपर्यंत तो पूर्णपणे बरा होईल अशी मला आशा आहे.”

विराट कोहलीच्या जागेवर हनुमा विहारीला भारतीय संघात दुसऱ्या कसोटीसाठी संघात जागा मिळाली होती. परंतू दोन्ही डावांमध्ये भारतीय फलंदाजांना फारशी चमक दाखवता आली नाही. पहिल्या डावात भारताचा डाव २०२ धावांवर आटोपला. दुसऱ्या डावात अजिंक्य आणि पुजाराच्या शतकी भागीदारीमुळे भारताने आव्हानात्मक धावसंख्या उभारली खरी, परंतू मधल्या फळीने केलेल्या हाराकिरीमुळे भारताला विराट कोहलीची उणीव प्रकर्षाने जाणवली. त्यामुळे तिसऱ्या कसोटी सामन्यापर्यंत विराट कोहली तयार होतो की नाही हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp