Pune Ruby Hall Doctor Suicide Case : गेल्या काही दिवसांपासून पुण्यात अनेक धक्कादायक घटना घडल्या आहेत. अशातच आता रुबी हॉल क्लिनिकमध्ये 28 वर्षीय डॉक्टरने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना रविवारी रात्री घडली. या डॉक्टरच्या मृत्यूवर मात्र संशय व्यक्त केला जातोय. रेडिओलॉजी विभागाच्या प्रमुखाकडून होणाऱ्या छळाला कंटाळून डॉक्टरने हे पाऊल उचललंय का याची पोलीस चौकशी करत आहेत. डॉक्टरच्या सुसाईड नोटमध्ये त्यांनी आपल्या विभागप्रमुखाचं नाव ‘पी.एम.’ असं संक्षिप्त रूपात लिहिलं असून, “थँक यू फॉर ऑल” असा संदेशही दिलाय.
ADVERTISEMENT
चिठ्ठीमध्ये काय लिहिलं?
गुजरातमधील भावनगर येथील रहिवासी असलेले डॉ. श्याम पंकज वोरा हे 2023 पासून रुबी हॉल क्लिनिकच्या रेडिओलॉजी विभागात इंटर्नशिप करत होते. डॉ. प्रणव महादेवकर यांच्या मार्गदर्शनाखाली ते इंटर्नशिप करत होते. रविवारी रात्री 10 च्या सुमारास पीजी डॉक्टर्सच्या वसतिगृहात गळफास घेऊन त्यांनी आत्महत्या केली.
हे ही वाचा >> सोनमने प्रॉपर प्लॅन केला, प्रियकराला इंदोरमध्येच थांबवून मारेकऱ्यांना... पोलीस चौकशीत मोठा खुलासा
डॉ. वोरा यांच्या सुसाईड नोटमध्ये लिहिलंय की, “मी पूर्णपणे उद्ध्वस्त झालोय. कुणालाही काहीही सांगू शकत नाही…” त्यांनी त्यांच्या मोबाइलचा पिन नंबरही या चिठ्ठीत लिहिलाय. “कृपया हा पिन माझ्या कुटुंबाला द्या” असं त्यांनी म्हटलंय. तसंच, त्यांनी यूपीआय पिन देखील लिहिला आणि नोटचा शेवट “थँक यू पी.एम. सर फॉर ऑल” असा केलाय.
वडिलांचे गंभीर आरोप
पुणे टाइम्स मिररने डॉ. श्याम वोरा यांचे वडील पंकज वोरा यांच्याशी संपर्क साधला असता, वडिलांनी सांगितलं की, त्यांनी विभागप्रमुखाला 40 हून अधिक कॉल केले. पण त्याला प्रतिसाद मिळाला नाही. “माझा मुलगा गेल्या दीड महिन्यांपासून निराश होता. तो सकाळपासून रात्रीपर्यंत सर्व शिफ्ट्समध्ये काम करत होता. त्याने मला सांगितलं होतं की, विभागप्रमुखांनी त्याला काही टार्गेट्स दिली होती. आम्हाला पोलिसांनी या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करावी अशी मागणी आहे.
हे ही वाचा >> लग्नानंतर प्रियकराला बोलत राहिली, नको नको ते सांगत राहिली... सोनमचे 'ते' चॅट्स समोर
श्याम वोरा यांचे वडील म्हणाले, "माझ्या मुलाने ‘पी.एम.’ असा उल्लेख केलाय. याचा अर्थ स्पष्टपणे प्रणव महादेवकर असा आहे. मी कोरेगाव पार्क पोलिसांना प्रथम एफआयआर नोंदवून नंतर पोस्टमॉर्टम करण्याची विनंती केली, पण त्यांनी माझं ऐकलं नाही. सुप्रीम कोर्टाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, मला माझ्या मुलाच्या मृत्यूचं कारण जाणून घेण्याचा हक्क आहे. मी बराच वेळ वाट पाहत आहे, पण रुग्णालयातील कोणीही सहकार्य करत नाही,” असं ते पुढे म्हणाले.
डॉ. वोरा यांच्या कुटुंबाचा आरोप
डॉ. वोरा यांचे मेहुणे हार्दिक पटेल म्हणाले, “रुग्णालय आणि विभागप्रमुखाची भूमिका संशयास्पद आहे. आम्ही त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, पण त्यांनी लक्ष दिलं नाही. श्याम हा कुटुंबातील एकमेव कमावता सदस्य होता. त्याचे वडील निवृत्त आहेत आणि त्याच्या पालकांना रक्तदाबाचा त्रास आहे. या घटनेमुळे आमचे संपूर्ण कुटुंब दुखात आहे.”
कोरेगाव पार्क पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुनील थोपटे यांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री 10 च्या सुमारास डॉ. वोरा यांच्या रूममेटने त्यांच्या खोलीचा दरवाजा ठोठावला, पण प्रतिसाद मिळाला नाही. काही वेळ वाट पाहिल्यानंतर त्याने सुरक्षा रक्षकाला बोलावले. मेंटेनन्स विभागाच्या कर्मचाऱ्यांनी खोली उघडली असता डॉ. वोरा छताच्या पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळले. पोलिसांना खोलीत सुसाईड नोट सापडली. त्यानंतर पोलीस आता डॉ. प्रणव महादेवकर यांची चौकशी करतील अशी शक्यता आहे.
ADVERTISEMENT
