धाराशिवमध्ये लोककलेच्या नावावर वेश्या व्यवसाय, 4 कला केंद्रांवर घडला प्रकार; 'असं' बाहेर आलं प्रकरण

Dharashiv Kalakendra News : धाराशिव जिल्ह्यातील 3 कला केंद्रावर एका विवाहित महिलेला कलेच्या नावाखाली वेश्या व्यवसाय करायला भाग पाडल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी पीडितेने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

Dharashiv Kalakendra News

Dharashiv Kalakendra News

मुंबई तक

21 Mar 2026 (अपडेटेड: 21 Mar 2026, 03:40 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

धाराशिव : नवरा दारु पिऊन त्रास देतो म्हणून मैत्रिणीला सांगितले,

point

मैत्रिणीने वेश्याव्यवसाय करायला भाग पाडले;

point

कलाकेंद्रांत सेक्स रॅकेट?

Dharashiv News, गणेश जाधव : धाराशिव जिल्ह्यातील 3 कला केंद्रावर एका विवाहित महिलेला कलेच्या नावाखाली वेश्या व्यवसाय करायला भाग पाडल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी पीडितेने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. फिर्यादीनुसार तिला धाराशिव जिल्ह्यातील पिंजरा, महाकाली व साई कला केंद्र या 3; तर लातूर जिल्ह्यातील बुधडा कला केंद्रात बळजबरीने डांबून ठेवून मारहाण करण्यात आली. ग्राहकांसोबत पैशाच्या बदल्यात वेश्या व्यवसाय करायला भाग पाडले. कला केंद्राच्या नावाखाली चालणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश या महिलेने केला आहे. 

हे वाचलं का?

पीडित महिलेच्या तक्रारीनंतर पिटा कायदा व भारतीय न्याय संहिता कलम 115(2), 3(5), 351(3) व 64(2)(m) अन्वये पुणे ग्रामीण येथील वालचंदनगर पोलिस ठाण्यात गुन्हा करण्यात आला असुन तपासासाठी हे प्रकरण धाराशिव ग्रामीण पोलिसाकडे वर्ग करण्यात आले आहे. या प्रकरणी पुणे वाघोली येथील सोनाली वाघ, लातुर येथील सचिन चंद्रकांत कापसे, सोनाली चंद्रकांत कापसे, अजय कापसे, माधुरी गिरी, अनिता कापसे व कविता कोळपेकर, बीड परळी येथील माधुरी गिरी व धाराशिव येथील अंजली अशा 9 संशयित आरोपी विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला. 

मैत्रिणीला सांगितले दु:ख अन्...

एका पीडित महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार, ती विवाहित होती मात्र नवरा तिला दारू पिऊन मारहाण करीत होता. तिने तिच्या संसारातील त्रास तिची मैत्रीण सोनाली वाघ हिला सांगितला. त्यानंतर पतीच्या त्रासाला कंटाळून ती येडशी येथील पिंजरा कला केंद्रात आली. तिथे तिने तिची ओळख मालकीण असलेल्या कविता कोळपेकर हिच्याशी करून दिली. यानंतर मैत्रिणीने तिथे मॅनेजर असलेल्या सचिन चंद्रकांत कापसे याच्याशी ओळख करून दिली. तिथे सचिन कापसे हा ग्राहक आले की त्यांच्याशी बोलणी करुन ग्राहकांना मुली दाखवायचा व ग्राहक मुली पसंद करुन त्यांना वेश्यागमनासाठी कला केंद्र बाहेर घेऊन जायचे.

हे ही वाचा : '..कारण ते स्वत: भाकड अन् भोंदू आहेत' कॅप्टन अशोक खरात प्रकरणी उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; नेमकं काय म्हणाले?

जेव्हा पीडित महिलेला हा प्रकार समजला तेव्हा तिने कला केंद्राबाहेर जाणेसाठी हट्ट केला असता तेथील मालकिण कविता कोळपेकर हिने मारहाण करुन डांबून ठेवले. मारहाण केल्यानंतर तिला एका ग्राहकासोबत सचिन हा येडशी येथील एका लॉजवर घेऊन गेला व तिथे अनैतिक संबंध ठेवले. लग्नाचे आमिष देऊन सचिन याने संबंध ठेवले. त्यानंतर त्याची सख्खी बहीण सोनाली चंद्रकांत कापसे हिच्याकडे साईनगर, लातूर येथे घेऊन गेला.

दुसरे कला केंद्र काढले तिथेही वेश्या व्यवसाय

सोनाली कापसे अगोदर पिंजरा कला केंद्र येथे होती. साईनगर येथे पीडितेला काही दिवस ठेवल्यानंतर तिथे मारहाण करायला सुरुवात झाली. त्यांनी मिळून पीडितेला बुधडा कला केंद्र (औसा रोड, लातूर) येथे रेखा जाधव या मालकिणीकडे 30 हजार रुपये घेऊन कामाला ठेवले, तिथेही तिला वेश्या व्यवसाय करायला भाग पाडले. सोनाली कापसे व अनिता कापसे हे पीडित महिलेला महाकाली कला केंद्र येरमाळा येथे घेऊन गेले. तिथे माधुरी गिरी या मालकिणीकडे या तिघी राहिल्या. तिथेही मालकिण माधुरी गिरी ग्राहकांकडून पैसे घेऊन वेश्या व्यवसाय करवून घेत होती. साई कला केंद्र नावाची पार्टी सोनाली कापसे हिने काढली. तिथेही वेश्या व्यवसाय करायला भाग पाडले.

हे ही वाचा : 'मी त्यांचा राजीनामा..' रुपाली चाकणकरांच्या राजीनाम्याबाबत सुनेत्रा पवार काय म्हणाल्या?

 

अटकपूर्व जामीनासाठी अर्ज

गुन्ह्यात अटक टाळण्यासाठी काही आरोपींनी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. सुनावणी दरम्यान ऍड. अमोल वरुडकर यांनी बाजू मांडली. सदर तक्रार ही आकसापोटी करण्यात आली असून, आरोपीचा यातील सहभाग तपासात अद्याप स्पष्ट झालेला नाही. आरोपी तपासाला पूर्ण सहकार्य करण्यास तयार असून, त्याची कोणतीही रिकव्हरी बाकी नसल्याने पोलिस कोठडीत ठेवण्याची गरज नाही, असा युक्तिवाद करण्यात आला. संशयित आरोपी कविताच्या वतीने वकिलांनी केलेला युक्तिवाद गाह्य धरून जामीन मंजुर करण्यात आला. ऍड. वैभव खांडेकर, ऍड. बालाजी पोतदार, ऍड. सचिन जाधव, ऍड. जनक साळुंखे, ऍड. विक्रम माने, ऍड. दीपक तुपसुंदरे यांनी काम पाहिले.

धाराशिव जिल्ह्यातील कला केंद्र वादाच्या भोवऱ्यात सापडलेली असतानाच हे प्रकरण समोर आले आहे. महाकाली हे एकमेव कला केंद्र सोडले; तर इतर 4 केंद्राचा परवाना जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी पोलिस अधीक्षक रितु खोखर यांच्या अहवालानंतर कायमस्वरूपी बंद केला आहे. पालकमंत्री प्रतापराव सरनाईक यांनी चुकीचे प्रकार करणाऱ्या कला केंद्रावर कारवाईचे निर्देश दिले होते. या प्रकरणात उच्च स्तरीय चौकशीची मागणी होत आहे. या प्रकरणात कला केंद्रवरील आणखी कोणी सहभागी आहेत का ? इतर कोणावर अत्याचार झाला आहे का ? यांचा तपास पोलिस करीत आहेत.

हे ही वाचा : शिवनिका संस्थानसाठी 39 लाख लिटर पाणी देण्यास देण्यात आली होती मंजुरी, कॅप्टन खरातचा शासन दरबारी होता दबदबा

 

नीलम गोऱ्हेंनी फडणवीसांना दिले निवेदन

दरम्यान, धाराशिव–लातूर परिसरातील घटनांच्या पार्श्वभूमीवर राज्यभरात कला केंद्रांच्या नावाखाली सुरू असलेल्या अनैतिक प्रकारांवर कारवाईची मागणी जोर धरू लागली आहे. विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देत या प्रकारांची गंभीर दखल घेण्याची मागणी केली आहे.

डॉ. गोऱ्हे यांनी नमूद केले की सोलापूर, धाराशिव, बीड, पुणे, अहिल्यानगर तसेच नाशिक व जालना या जिल्ह्यांमध्ये कला केंद्रांना परवाने देण्यात आले आहेत. मात्र लोककलेच्या नावाखाली काही ठिकाणी अनैतिक प्रकार सुरू असल्याचे प्रकार समोर येत आहेत. राज्यातील सर्व कला केंद्रांची महिला पोलीसांच्या माध्यमातून अचानक व वारंवार तपासणी करण्यात यावी, तसेच अल्पवयीन मुलींना फसवून आणले जात आहे का याची सखोल चौकशी करण्याचे निर्देश शासनाने द्यावेत, अशी मागणी त्यांनी केली आहे.

अनैतिक व बेकायदेशीर प्रकार आढळल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी ठाम भूमिका मांडत महिला सुरक्षिततेच्या दृष्टीने शासनाने तातडीने पावले उचलावीत, असेही त्यांनी नमूद केले आहे.
 

    follow whatsapp