घराला रंगकाम करण्यासाठी आले, महिलेला एकटं पाहून नको तेच अन्..

मुंबई तक

14 Jun 2026 (अपडेटेड: 14 Jun 2026, 11:57 AM)

Crime news : घराला रंग मारण्यासाठी आलेल्या दोन मजुरांनी महिलेवर लैंगिक अत्याचार केला. नंतर तिला मारहाण करत तिच्याकडून काही पैसे नेल्याचा आरोप करण्यात आला. पीडित महिला गंभीर जखमी झाली असून तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

crime news

crime news

Google CTA

बातम्या हायलाइट

point

घराला रंग देणाऱ्या कामगारांनी महिलेवर केला लैंगिक अत्याचार 

point

नंतर पैसे घेऊन घटनास्थळावरून झाले फरार

Crime news : मध्य प्रदेशातील सिधी जिल्ह्यात एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. घराला रंग मारण्यासाठी आलेल्या दोन मजुरांनी महिलेवर लैंगिक अत्याचार केला. नंतर तिला मारहाण करत तिच्याकडून काही पैसे नेल्याचा आरोप करण्यात आला. पीडित महिला गंभीर जखमी झाली असून तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. पोलिसांनी या प्रकरणी आरोपीला तातडीने कारवाई करून अटक केली. 

हे वाचलं का?

हे ही वाचा : नर्सकडून आधी नवऱ्याला घटस्फोट आणि मग मोठं कांड

घराला रंग देणाऱ्या कामगारांनी महिलेवर केला लैंगिक अत्याचार 

घडलेल्या घटनेनुसार, जामोडी पोलीस ठाणे परिसरात एका घराला दोन कामगार रंग देत होते. महिला घरात एकटीच आढळून आली होती, हिच संधी साधून नराधमांनी तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. आरोपींनी तिला बेदम मारहाण करत जखमी केलं. तिच्याकडील रोकडही हिसकावून घेतली आणि घटनास्थळावरून पळ काढला. 

या घटनेनंतर पीडितेला रक्तस्त्राव होऊ लागला आणि तिला तात्काळपणे रुग्णालयात दाखल करण्यात आले, जिथे तिच्यावर उपचार करण्यात आले. संबंधित घटनेची माहिती मिळताच, जामोडी पोलिसांनी तातडीने कारवाई करत दोन्ही आरोपींना शोध सुरू केला. 

हे ही वाचा : समीरने 20 वर्षीय गर्लफ्रेंडवर लैंगिक अत्याचार केला, गुप्तांगातून रक्तस्त्राव अन्...

पोलिसांनी तातडीने कारवाई करत दोघांना अटक केली. प्राथमिक तपासात आरोपी करण्यात आला की, हे घराचे रंगकाम करणारे लोक होते. पोलिसांनी तातडीने वैद्यकीय तपासणी केली असून पुरावे गोळा करण्याचे काम सुरू केले. सध्या पोलीस या प्रकरणाची चौकशी करत सखोल तपास सुरू केला. या घटनेनंतर परिसरात संतापाचे वातावरण आहे. स्थानिकांनी कठोर कारवाईची मागणी केली.