CJP Candal March Protest : देशभर सुरू असलेल्या जेन झीच्या आंदोलनाने क्रांतीचा वणवा पेटवल्यांचं चित्र आहे. दिल्लीत सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनात अनेक विद्यार्थ्यांना बेदम मारहाण झाली होती. याचपार्श्वभूमीवर आता आंदोलकांनी देशभर कँडल मार्च काढण्याचं सर्वांना आवाहन केलं आहे. सरकारने आरोपींना कठोर शिक्षेबाबत तसेच आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांची नुकसान भरपाई करण्याचे आश्वासन दिले असले तरीरी शांतपूर्ण आंदोलन सुरू राहणार असल्याचं विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : महाराष्ट्र TET पेपरफुटीचा मुख्य आरोपी अटकेत, आतापर्यंत एकूण 14 जणांना अटक
'प्रत्येक जिल्हा, एक दिवस आणि एक मागणी'
विद्यार्थ्यांनी महत्त्वाची मागणी अशी की, धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्यावा. मात्र, सरकारने याबाबत एक चकार शब्द काढलेला नाही. याचपार्श्वभूमीवर देशव्यापी कँडल मार्चचे आवाहन करण्यात आले आहे. प्रत्येक जिल्हा, एक दिवस आणि एक मागणी या घोषणेखाली एक मागणी असे आवाहन करण्यात आलंय.
देशव्यापी कँडल मार्च
देशभरात जिल्हाधिकारी कार्यालयांबाहेर रविवारी सायंकाळी 6 वाजता कँडल मार्च सुरू होणार आहेत. सहभागींना एकत्र या संघटित व्हा मागण्या वाचून दाखवा आणि कँडल मार्च करण्याचे आवाहन करण्यात येते. ही कँडल मार्चची घोषणा विद्यार्थ्यांना झालेल्या मारहाणीतून आहे.
हे ही वाचा : Astrology : बुधाचा मिथुन राशीत उदय, 'या' राशींना फायदा तर काही राशींवर संकट
दरम्यान, विद्यार्थ्यांच्या या मागणीनंतर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकताच एक इंस्टाग्राम रिल शेअर केली होती. मात्र त्या व्हिडिओत त्यांनी धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याबाबात काहीही उल्लेख केला नव्हता. यामुळे आता विद्यार्थी शांततेने आंदोलन सुरूच ठेवणार आहेत. अशातच शांतपणे कँडल मार्च काढण्याच्या निर्णयाबाबत देशातील तरुण विद्यार्थी त्याला कसा प्रतिसाद देतील हे पाहणं गरजेचे आहे.
ADVERTISEMENT












