Ajit Pawar यांच्यावर भन्नाट मीम्स, यूजर्सच्या क्रिएटिव्हिटीला धुमारे…

मुंबई तक

18 Apr 2023 (अपडेटेड: 18 Apr 2023, 03:45 PM)

अजित पवार यांच्याविषयी अनेक क्रिएटिव्ह मीम्स युजर्सनी तयार केली आहेत.  पहा काही भन्नाट मीम्स…

Memes about Ajit Pawar are going viral on social media.

Memes about Ajit Pawar are going viral on social media.

follow google news

मुंबई : राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) 40 आमदारांसोबत भाजपसोबत (BJP) जाणार असल्याच्या चर्चांनी प्रचंड जोर धरला होता. यामुळे राज्यात नवं राजकीय समीकरण पाहायला मिळेल अशी चर्चाही सुरू झाली होती. अखेर याबाबत स्वत: अजित पवारांनी मुंबईत पत्रकारांशी संवाद साधत या सर्व चर्चा आणि बातम्या फेटाळून लावल्या. यावेळी त्यांनी त्यांची नेमकी काय भूमिका आहे याबाबत भाष्य केलं आहे. (Ajit Pawar has clearly declared his position whether he will go with bjp or not)

हे वाचलं का?

यावेळी बोलताना अजित पवार म्हणाले, आपण ज्या काही सातत्याने माझ्याबद्दलच्या बातम्या दाखवत आहात, मी आपल्याला सांगेन की, त्यात यत्किंचितही तथ्य नाही. कोणत्याही आमदारांच्या सह्या घेण्यात आलेल्या नाहीत. आम्ही सगळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहोत आणि पक्षातच कायम राहणार आहोत. बाकी सगळ्या अफवा आहेत. या प्रकारच्या बातम्यांना कोणताही आधार नाही.’ असं म्हणत अजित पवार यांनी त्यांच्याबाबत सगळ्या चर्चांना पूर्णविराम दिला आहे.

अजित पवारांमुळे बंड करणाऱ्या शिवसेनेच्या आमदारांना आता ‘दादा’च हवेत!

मात्र या सगळ्या चर्चा आणि बातम्यांदरम्यान, ,अजित पवार यांच्याबाबत सोशल मिडियावर प्रचंड चर्चा झाली. त्यांच्या भूमिका त्यांचा स्वभाव याबाबत अनेकांनी वेगवेगळी मत व्यक्त केली. तसंच सोशल मिडीयावर अजित पवार यांच्याबद्दलचे मीम्सही मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. अजित पवार यांच्याविषयी अनेक क्रिएटिव्ह मीम्स युजर्सनी तयार केली आहेत.

BJP: ‘जीवात जीव असेपर्यंत मी..’ अजित पवारांकडून एक घाव दोन तुकडे!

पहा अजित पवार यांच्यावरील काही भन्नाट मीम्स :

एका युजरने देवेंद्र फडणवीस अजित पवार यांचे भाजपमध्ये स्वागत करतात यावर मीम तयार केलं आहे. 

एका युजरने अजित पवार यांच्याबद्दल हेरा फेरी चित्रपटातील सीनवर मीम तयार केलं आहे. 

एका युजरने सुर्यकुमार यादवचा एक व्हिडीओ पोस्ट करुन त्यावर शरद पवार महाविकास आघाडीला ‘मी आहे टेन्शन घेऊ नका’ असं म्हणतं असल्याचं सांगण्याचा प्रयत्न केला आहे. 

एका युजरने अजित पवार यांना जीपीएस बसवा, म्हणजे नॉट रिचेबलचा प्रश्न मिटेल, असं म्हटलं होतं. त्यावर दुसऱ्या एका युजरने अजित पवार राजभवनात दाखल होतं असल्याचं म्हणतं एक गुगल मॅपचा फोटो शेअर केला आहे. 

    follow whatsapp