Mach Against Election Commission : निवडणूक आयोगाच्या कारभाराविरोधात मनसेप्रमुख राज ठाकरे आणि शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा एकत्र येत आक्रमक भूमिका घेतली आहे. दोन्ही नेत्यांनी निवडणूक आयोगाविरोधात एल्गार पुकारत येत्या 4 तारखेला मुंबईत एका भव्य संयुक्त मोर्चाचे आयोजन केले आहे. हा भव्य मोर्चा भायखळ्यातील रिचर्डसन क्रूडासपासून ते मुंबई महानगरपालिका मुख्यालयापर्यंत काढण्यात येणार असून, सकाळी 10 वाजता या आंदोलनाला प्रत्यक्ष सुरुवात होणार आहे.
ADVERTISEMENT
सत्ताधारीही सामील होऊ शकतात
हा मोर्चा कोणत्याही एका विशिष्ट राजकीय पक्षापुरता मर्यादित नसून देशातील लोकशाही आणि संविधानाच्या रक्षणासाठी पुकारलेला लढा असल्याचे राज ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे. या मोर्च्यामध्ये कोणत्याही राजकीय पक्षांचे झेंडे वापरले जाणार नसून, आंदोलकांच्या हातात केवळ तिरंगा असणार आहे. लोकशाहीच्या रक्षणासाठी या लढ्यात सर्व राजकीय पक्षांनी सहभागी व्हावे, असे आवाहन करतानाच गरज पडल्यास सत्ताधारी पक्षातील लोकही यामध्ये सामील होऊ शकतात, असा थेट मार्ग राज ठाकरे यांनी मोकळा ठेवला आहे.
हे ही वाचा : बारामतीत 2 महिलांची निर्घुण हत्या कशामुळे? प्राथमिक तपासातून मोठा खुलासा
लोकशाहीला काळिमा
निवडणूक आयोगाच्या 'एसआयआर' (SIR) प्रक्रियेवर बोट ठेवत राज ठाकरे यांनी संताप व्यक्त केला आहे. आम्ही निवडणुकांसाठी मेहनत घेत असतो, मात्र जर अशा प्रकारे निवडणुकीत हेराफेरी (मॅनिप्युलेशन) होत असेल तर तो लोकशाहीला काळिमा आहे. तसेच मतदारांच्या मताचा अपमान असल्याचं राज ठाकरे यांनी सांगितलं.
हे ही वाचा : महाराष्ट्राच्या मुख्य निवडणूक आयुक्तांच्या मोठ्या मागण्या, 'ते' पत्र तुफान चर्चेत
सीजेपीच्या आंदोलनाला पाठिंबा
दुसरीकडे उद्धव ठाकरे यांनी या संपूर्ण आंदोलनाला आणि सीजेपीच्या (CJP) भूमिकेला आपला पूर्ण पाठिंबा जाहीर केला आहे. निवडणूक आयोगाच्या भूमिकेविरोधात दोन्ही ठाकरे बंधू एकाच व्यासपीठावर येऊन लढा देणार असल्याने राज्यातील राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. लोकशाही आणि संविधानाच्या बचावासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र येत पुकारलेल्या या एल्गारामुळे आगामी काळात निवडणूक आयोग आणि प्रशासनावरील दबाव वाढण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.
ADVERTISEMENT












