Raj Thackeray : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा ठाण्यात पदाधिकारी मेळावा पार पडला. यावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सर्वांना सतर्क राहण्याचे आवाहन केले. ते म्हणाले की, '14 तारखेला गणपती येतील. मला सर्वांत जास्त भीती आहे की गणपतीच्या दिवसांत दंगली घडवल्या जातील. फक्त महाराष्ट्रातच नव्हे तर देशभरात. जेणेकरुन तुम्ही त्याच गोष्टींमध्ये अडकले पाहिजे. बाकीच्या सगळ्या गोष्टींकडे तुमचं दुर्लक्ष झालं पाहिजे. आताच मुंबईमध्ये त्याची झलक पाहिली तुम्ही. एक-दोन घटना घडल्या. ही सुरुवात आहे.'
ADVERTISEMENT
सतर्क रहा
यापुढं बोलताना राज ठाकरे म्हणाले की, ' जो सुजाण हिंदू आहे आणि जो सुजाण मुसलमान आहे मला दोघांनाही सांगायचंय की सतर्क रहा. आपल्या नावाने, त्यांच्या नावाने हे कोणतरी घुसवतील आणि यातून दंगली घडवतील. हकनाक आपली पोरं जातील. त्यांची पोरं जातील. तिकडेच लक्ष जाईल तुमचं. एक-दुसऱ्याचा दु:स्वास करणे यामध्ये तुम्हाला गुंतवून ठेवणे आणि मूळ परिस्थितीकडे दुर्लक्ष करायला लावणे एवढा फक्त कार्यक्रम आता चालू आहे. कारण आता देशाची परिस्थिती अत्यंत वाईट आहे.'
हे ही वाचा : पडळकरांना मराठा आंदोलकांनी रोखलं, घोषणा होताच गाडी थांबवली, गोंधळ!
डीजेच्या वादावर काय म्हणाले?
पुण्यात डीजेविषयी सुरु असलेल्या वादाबद्दल बोलताना त्यांनी सांगितलं की, 'डीजे वाजवायचा, वाजवायचा नाही जे काय वाद सुरु आहेत याविषयी मुख्यमंत्री काय बोलले ते मला अजून नाही कळलं. माझी बातमी जर चुकीची नसेल तर नागपूरता डीजे बंद झालाय. बाकी महाराष्ट्रात आहे. यावरती मुख्यमंत्री सांगताहेत कायद्याने आम्हाला बंदी आणता येत नाही. मग नागपूरात कसं बंद झालं?'
हे ही वाचा : ज्यांच्यासोबत चर्चा केली त्या मंत्र्यांनाच जरांगेंनी फैलावर का घेतलं?
धर्माच्या गोष्टींमध्ये गुंतवायचं आणि...
पुढं बोलताना ते म्हणाले की, 'आज प्रत्येक शाळेच्या आणि कॉलेजच्या बाहेर कुठच्याही पान टपरीवरती ड्रग्ज मिळताहेत. ड्रग्जने तुम्हाला बेहोश करुन टाकायचं, धर्माची तुम्हाला गुंगी आणायची, जातीच्या तेढामध्ये अडकून टाकायचं आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी करायला हे मोकळे. आम्ही जंगलं तोडतोय, आम्ही मुंबई-पुण्यातल्या जमिनी देतोय त्या अदानीला. लक्षच नाही तुमचं. आमचं एसआयआरकडे लक्ष नाही, आमच्या जमिनी कोण घेतंय याकडे लक्ष नाही. धर्माच्या गोष्टींमध्ये तुम्हाला गुंतवायचं आणि म्हणून मला भीती वाटते की येणाऱ्या गणपतीच्या सणामध्ये कुठे दंगली घडू नयेत.'
ADVERTISEMENT












