समृद्धी हायवे अपघात: ‘टायर तर नवीनच टाकलेले…’, ‘त्या’ बस मालकाने सगळंच सांगितलं!

मुंबई तक

बुलढाण्यात समृद्धी महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात 26 जणांचा मृत्यू झाला. याबाबत विदर्भ ट्रॅव्हल्स कंपनीचे संचालक वीरेंद्र दरणे यांनी याबाबत एक नवी माहिती दिली आहे.

ADVERTISEMENT

26 people died horrific accident samruddhi highway buldhana new tyre bus virendra darne vidarbha travels company owner
26 people died horrific accident samruddhi highway buldhana new tyre bus virendra darne vidarbha travels company owner
social share
google news

नागपूर: बुलढाण्यातील सिंदखेडराजा येथे समृद्धी महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात विदर्भ ट्रॅव्हल्सच्या एका बसमधील तब्बल 26 जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. सुरुवातीला असं सांगितलं जात होतं की, बसचा टायर फुटल्याने हा अपघात झाला. मात्र, या ट्रॅव्हल्सचे संचालक वीरेंद्र दरणे यांनी एक वेगळीच माहिती दिली आहे. वीरेंद्र दरणे यांच्या म्हणण्यानुसार, या बसचे टायर हे नुकतेच बदलण्यात आले होते. त्यामुळे हा अपघात नेमका रस्त्यामुळे झाला की, कशामुळे झाला हे शोधावं लागेल. असं त्यांनी म्हटलं आहे. (26 people died horrific accident samruddhi highway buldhana new tyre bus virendra darne vidarbha travels company owner )

पाहा विदर्भ ट्रॅव्हल्सचे संचालक काय म्हणाले..

‘ही जी बस आहे ती नवीनच होती. ती 2020 मध्ये खरेदी केली होती. आमच्या कुटुंबाचा व्यवसाय आहे हा. आम्ही जेव्हा गाडी खरेदी केली तेव्हाच लॉकडाऊन सुरू झालं होतं. त्यामुळे वर्षभर गाड्या उभ्याच होत्या. ही बस जवळपास 5 वाजता नागपुरातून निघाली. त्यानंतर कारंजावरुन बसने समृद्धी महामार्ग धरला. या बसचा जो ड्रायव्हर होता. तो जुना ड्रायव्हर आहे. त्याला बराच अनुभव देखील होता. दानिश असं त्याचं नाव आहे. आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार, बसचा टायर फुटल्याने तिची डिव्हायडरला धडक बसली.’

‘या एसी बस असतात.. यामध्ये प्लाय, गाद्या यासारख्या वस्तू असल्याने त्या लवकर पेट घेतात. तसंच गाडीत 300 ते 400 लीटर डिझेल देखील असतं. या गाडीचे टायर सुद्धा नवीन आहेत. नुकतेच टाकले होते. या गाडीचे सर्व कागदपत्रं देखील रितसर आहेत. आता आम्ही तिथे जात असून मृतकांच्या नातेवाईकांना मदत करत आहोत.’

हे ही वाचा >> Buldhana Accident: लाडक्या लेकाला नागपूरला सोडलं अन्.., नवरा-बायको अन् मुलीचा दुर्दैवी मृत्यू

‘मी फोनवरुन त्यांच्या नातेवाईकांशी सतत संपर्क ठेवून आहोत. हा जो अपघात आहे त्याचं कारण आम्ही शोधणार आहोत. नेमका अपघात हा रस्त्यामुळे झाला की, कशामुळे झाला हे आम्हाला शोधावं लागेल.’ असं वीरेंद्र दरणे यावेळी म्हणाले.

हे वाचलं का?

    follow whatsapp