Nashik Accident : सप्तश्रृंगी गडावर कठडा तोडून प्रवासी बस कोसळली घाटात, पहा Video
सप्तशृंगी गड ते खामगाव ही बुलढाणा आगाराची एसटी बस थेट दरीत कोसळली. या बसमध्ये 18 प्रवासी होते अशी प्राथमिक माहिती आहे. या अपघातात एका महिलेचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.
ADVERTISEMENT

Nashik Bus Accident : मुंबई-नागपूर महामार्गावरील खासगी बसला अपघात झाल्याच्या घटनेला आठवडात होत नाही, तोच नाशिक जिल्ह्यातील सप्तश्रृंगी गडावर एक भयंकर अपघात घडला आहे. प्रवाशांना घेऊन निघालेली बस रस्त्याचा कठडा तोडून घाटात कोसळली. वणी घाटात 400 फूट खोल खाली ही बस गेली. यात 1 प्रवाशाचा मृत्यू झाला असून, 22 जण जखमी झाले आहेत. बस घाटात कोसळल्यानंतरचा व्हिडीओही समोर आला आहे.
सप्तश्रृंगी गड घाट म्हणजेच वणीच्या बसचा भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. सप्तशृंगी गड ते खामगाव ही बुलढाणा आगाराची एसटी बस थेट दरीत कोसळली. या बसमध्ये 23 (चालक आणि वाहकासह) प्रवासी होते अशी माहिती देण्यात आली आहे. या अपघातात एका महिलेचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.
मंगळवारी (12 जुलै) सकाळी 6:45 वाजता मुक्कामी बस (Mh 40 AQ 6259) सप्तशृंगी गडावरून खामगावच्या दिशेने निघाली होती. काही किलोमीटर अंतरावरच असलेल्या घाटातील गणपती टप्प्यावरुन बस थेट दरीत कोसळली.
वाचा >> Pawar Family: अजितदादांच्या बंडानंतर पक्ष, पवार कुटुंबात फूट पण ‘इथे’ मात्र सगळे एकत्र!
घटनेची माहिती मिळताच सप्तशृंगी देवी ट्रस्ट, पोलीस प्रशासन, ग्रामस्थ, आपत्ती व्यवसथापन घटनास्थळी दाखल झाले आणि घाटातून जखमींना झोळी करून बाहेर काढण्यात आले. जखमींना वणी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.










