Irshalwadi Landslide : ‘भला मोठा कडाच…’, एकनाथ शिंदेंना इर्शाळवाडी काय दिसलं?
शोध मोहिमेची पाहणी केली. त्यानंतर आज मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत निवेदन केलं. इर्शाळवाडीवर झालेल्या आघाताची शिंदेंनी सर्व कहाणी सांगितली. त्याचबरोबर एक खंतही व्यक्त केली.
ADVERTISEMENT

Irshalwadi Landslide Latest news : इर्शाळगडाच्या कुशीत असलेली 50 घरांची इर्शाळवाडी उद्ध्वस्त झाली. अजूनही अनेकजण दरडीच्या ढिगाऱ्याखाली असल्याची भीती व्यक्त होत असून, शोध मोहीम सुरूच आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घटनास्थळी जाऊन नातेवाईकांची भेट घेतली. शोध मोहिमेची पाहणी केली. त्यानंतर आज मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत निवेदन केलं. इर्शाळवाडीवर झालेल्या आघाताची शिंदेंनी सर्व कहाणी सांगितली. त्याचबरोबर एक खंतही व्यक्त केली.
इर्शाळवाडी दुर्घटनेबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सभागृहात निवेदन केलं. ते म्हणाले, “19 जुलैला खालापूर तालुक्यातील इर्शाळवाडीमध्ये दरड कोसळली. मोठी दुर्घटना घडली. रात्री (19 जुलै) 11.35 वाजता याची माहिती मिळाली. त्यानंतर प्रशासकीय यंत्रणेनं बचाव कार्यासाठी हालचाली केल्या. अतिशय दुर्गम भाग, वादळी वारा, पाऊस अशा स्थितीत रात्री 11.40 वाजता प्रशासकीय यंत्रणा तिथे पोहोचली. मी त्यांच्या संपर्कात होतो. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस संपर्कात होते, तर अजित पवारही नियंत्रण कक्षात होते.”
वाचा >> Irshalwadi Landslide : …म्हणून इर्शाळवाडीवर कोसळली ‘मड फ्लो’ दरड!
– “तत्काळ बचाव कार्य करण्यासाठी यशवंती हायकर्स संस्थेचे 25 स्वयंसेवक आणि चौकमधील 30 ग्रामस्थ, वरोशाचे 20 ग्रामस्थ आणि खोपोली नगरपालिकेचे कर्मचारी, कोलाडचे रिव्हर फायटर्स असे सगळे लोक तातडीने तिथे पोहोचले. एनडीआरएफच्या चार टीम पोहोचल्या. टीडीआरएफचे 100 जवान, स्थानिक बचाव पथकाच्या पाच टीम यांनी मोलाची कामगिरी बजावली.”
इर्शाळवाडी डोंगर कपारीत
– “घटनेची माहिती मिळताच मी जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक यांच्या संपर्कात होतो. आमदार महेश बालदींनी मला फोन केला होता. मी गिरीश महाजनांना फोन केला. उदय सामंत, दादा भुसे हे रात्री तीन वाजता जिथे घटना घडली तिथे होते. डोंगराच्या कपारीत हे गाव वसलेले आहे.”










