Irshalwadi Landslide : अशी होती इर्शाळवाडी, ड्रोन व्हिडीओ व्हायरल
इर्शाळवाडी दरड कोसळून उद्ध्वस्त झाली. पण, ती आधी कशी दिसत होती, हे एका व्हिडीओ बघायला मिळत आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
ADVERTISEMENT

Irshalwadi Landslide videos : रायगड जिल्ह्यात असणाऱ्या इर्शाळगडाच्या पायथ्याशी असलेली इर्शाळवाडी 19 जुलै रोजी उद्ध्वस्त झाली. 50 घरं असलेल्या या वाडीवर निसर्गाचा कोप झाला. घरं, पशुधनासह अनेक माणसं ढिगाऱ्याखाली गाडली गेली असून, त्यांना बाहेर काढण्याचं काम केलं जात आहे. अशातच इर्शाळवाडीचा ड्रोन द्व्रारे शूट केलेला व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. (Irshalwadi Drone Video)
इर्शाळगडाचा पायथ्याला खाली सपाट जागेवर इर्शाळवाडी हे गाव वसलेले. ठाकर आदिवासी समाजाची ही वाडी. इथे जायचं म्हटलं तर पायीच जावं लागतं, इतकी ती वर आहे. दोन डोंगरमाथे चढून गेल्यानंतर इर्शाळवाडीत पोहोचता येतं. निसर्ग सौंदर्याच्या सान्निध्यात आणि इर्शाळगडाच्या कुशी वसलेल्या या वाडीला काळाची नजर लागली.
इर्शाळवाडीचा ड्रोन व्हिडीओ
19 जुलै रोजी रात्री 10 ते 11 वाजेच्या दरम्यान इर्शाळवाडी गावावर दरड कोसळली. मोठं मोठी झाडं आणि चिखलाच्या थरामुळे घरं आणि माणसं 20 फूट खाली दबली गेलीये. त्यांना काढण्यासाठी आता युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. अनेक जण गुगल अर्थ वरून इर्शाळवाडी नेमकी कुठे येते. याचा शोध घेताना दिसताहेत. अशातच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय.
वाचा >> IrshalWadi Landslide : ‘माझे तर सगळेच मेले’, वन विभागामुळे इर्शाळवाडी गेली मृत्यूच्या जबड्यात!
किती सुंदर गाव होतं राव हे.💔
व्हिडीओ साभार : व्हॉट्सॲप
#इरशाळवाडी pic.twitter.com/sPuKQJXQ3p— Prashant Dhumal (@prash_dhumal) July 20, 2023
वाचा >> Irshalwadi Landslide : …म्हणून इर्शाळवाडीवर कोसळली ‘मड फ्लो’ दरड!
ड्रोनद्वारे हा व्हिडीओ शूट केला गेला आहे. सुरूवातीला या व्हिडीओमध्ये तीन तरुणी, लहान मुलं दिसत आहेत. आजूबाजूला कुडाची आणि कौलारू मोजकीच घरं दिसत आहे. ड्रोन वर गेल्यानंतर संपूर्ण इर्शाळवाडी दिसून येते आणि बाजूलाच उभा असलेला इर्शाळगडही दिसत आहे. इर्शाळवाडीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ पाहून अनेक हळहळ व्यक्त करत आहेत.
रेस्क्यू ऑपरेशन सुरू
20 जुलै रोजी प्रशासनाने इर्शाळवाडीतील रेस्क्यू ऑपरेशन सायंकाळी पाच वाजता थांबवलं होतं. त्यानंतर 21 जुलै रोजी सकाळी पाच वाजता परत बचाव व मदत मोहीम सुरू करण्यात आली आहे. मातीचा ढिगारा बाजूला करण्यसाठी इर्शाळवाडीत छोटे जेसीबी आणि इतर मिशनरी, सामुग्री हेलिकॉप्टरद्वारे घेऊन नेण्यात येणार आहे.