Irshalwadi Landslide : शोध सुरू, पण आशा मावळल्या! इर्शाळवाडीत काय सुरूये?

भागवत हिरेकर

इर्शाळवाडीत शोध कार्य सुरू असून, आणखी एनडीआरएफच्या तुकड्या पाठवण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर जीवनावश्यक वस्तुही पाठवल्या जात आहेत.

ADVERTISEMENT

Irshalwadi landslide rescue operation latest update : ndrf take dog squad help for search.
Irshalwadi landslide rescue operation latest update : ndrf take dog squad help for search.
social share
google news

Raigad Landslide Latest News : निसर्गाच्या प्रकोपाचा बळी ठरलेल्या इर्शाळवाडीत अजूनही अनेकजण भल्यामोठ्या चिखलाच्या ढिगाऱ्याखालीच दबलेले आहेत. पायी जाण्याशिवाय कुठलाही पर्याय नसलेल्या याठिकाणी जवानांना हातानेच चिखल आणि इतर ढिगारा बाजूला करावा लागत असून, 24 तासांहून अधिक काळ लोटला तरी मोहीम सुरूच आहे. 20 जुलै रोजी बचाव व मदत कार्य थांबवण्यात आलं होतं. 21 जुलै पहाटे परत मदत कार्य हाती घेण्यात आलं असून, जवान दबल्या गेलेल्यांना बाहेर काढण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करत आहेत. पण, बरेच तास लोटले असल्याने दरडीखाली दबल्या गेलेले जिवंत असण्याचा आशा मावळू लागल्या आहेत. (Irshalwadi Landslide incident updates : No one expected to remain alive after those trapped under the debros have been there for over 24 hours)

19 जुलैच्या रात्री इर्शाळवाडीवर दरड कोसळली. मोठंमोठी झाडंही घरांवर उन्मळून पडली. संततधार पावसात आव्हानात्मक स्थितीत शोध कार्य सुरू आहे. एनडीआरएफच्या पथकाचे प्रमुख राहुल कुमार रघुवंश यांनी सांगितलं की, “आम्ही तीन पद्धतीने शोध घेत आहोत. आम्ही श्वानांच्या मदतीने घेत आहोत. दुसरं म्हणजे जवानही शोध कार्यात आहेत. हे ठिकाण खूप अवघड आहे. उंचावर चढून जावं लागतं, पण आम्ही याचं प्रशिक्षण घेतलेलं आहे. काल (20 जुलै) जेव्हा आम्हाला याची माहिती मिळाली तेव्हा पथक घटनास्थळी पोहोचले आणि शोध मोहीम सुरू केली.”

ढिगाऱ्याखाली दबलेल्यांच्या शोधासाठी श्वानांची मदत

एनडीआरएफच्या जवान फावडे, टिकाव आणि टोपल्याने दरडीचा ढिगारा बाजूला करत आहे. कारण याठिकाणी कोणतीही मशिनरी पोहोचणं खूप अवघड आहे. आता माती खाली दबलेल्यांना शोधण्यासाठी श्वानांची मदत घेतली जात आहे. त्यासाठी काही श्वानही इर्शाळवाडीत आणले गेले आहेत.

वाचा >> Irshalwadi Landslide : अशी होती इर्शाळवाडी, ड्रोन व्हिडीओ व्हायरल

हे वाचलं का?

    follow whatsapp