Kalwa Hospital : 18 रुग्णांचा मृत्यू कसा झाला? रुग्णालय प्रशासनाने सांगितली कारणे
ठाण्यातील कळव्यात असलेल्या महापालिकेच्या रुग्णालयात 18 रुग्णांचा मृत्यू झाला. यावर प्रशासनाकडून खुलासा करण्यात आला.
ADVERTISEMENT

Chhatrapati shivaji maharaj hospital kalwa : ठाणे महापालिकेचे कळव्यातील रुग्णालयात आधी एका दिवसात पाच, तर आता एका रात्री 18 रुग्णांचा मृत्यू झालाय. यावरून नातेवाईकांनी रुग्णालय प्रशासनावर आरोप केलेत. दुसरीकडे राजकीय नेत्यांनी प्रशासनाला धारेवर धरलंय. पण, प्रश्न असा उपस्थित झाला की, 18 रुग्णांचा मृत्यू कसा झाला? याच प्रश्नावर रुग्णालय प्रशासनाने अखेर खुलासा केलाय. (Why 18 patients died in Kalwa hospital)
18 रुग्णांचा मृत्यू झाल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय प्रशासनाने पत्रकार परिषद घेऊन भूमिका स्पष्ट केली. प्रशासनातील अधिकाऱ्याने सांगितले की, “छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय प्रशासनाने सांगितलं की, “काल रात्री रुग्णालयात 18 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यापैकी 6 रुग्ण असे होते की, जे 24 तासांच्या आत गेलेले आहेत. म्हणजे काही लोक पाऊण तासात. काही लोक अर्ध्या तासात. यातील 5 रुग्ण असे होते की, ज्यांना ताप आणि दम लागणे म्हणजेच फुफ्फुसात संसर्ग झालेला होता. एकाच उदाहरण देतो, बाकी सगळे त्याच प्रकारचे होते. एका रुग्णाच्या प्लेटलेट्स 6000 होत्या.”
अल्सर फुटल्याने एका महिलेचा मृत्यू
“अत्यावस्थ रुग्ण येतात. आल्या आल्या आम्ही त्यांना बघितलं, पण रुग्ण दगावला. असे अजून चार रुग्ण आहेत. एक रुग्ण अशी होती जिचा अल्सर फुटलेला होता. ती रुग्ण इतकी अत्यवस्थ होती की, पाच मिनिटं उशीर झाला असता, तर रुग्णालयात यायच्या आधीच मृत्यू झाला असता. तिला आयव्ही देऊन हार्ट चालू केलं. पण, तिचा मृत्यू झाला”, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
वाचा >> “…तर अशा मुख्यमंत्र्यांची ठाण्याला गरज नाही”
“एक रुग्ण असा होता की ज्याने रॉकेल (केरोसिन) पिलेलं होतं. चार वर्षाचा मुलगा होता. भरपूर केरोसिन पिऊन आलेला होता. नाही वाचवू शकलो. मृत्यू झालेल्या रुग्णांमध्ये एकाला साप चावलेला होता. यात काही रुग्ण चार दिवसांपासून होते. काही पाच दिवसांपासून होते. एक अज्ञात रुग्ण होती, तिच्या डोक्याला मार लागलेला होता. तिला ब्रेन ट्रॉमा होता”, अशी माहिती रुग्णालयाकडून देण्यात आली.