Maratha Morcha: फडणवीस म्हणतात, ‘मराठा आंदोलकांनी आधी दगडफेक केली, म्हणून पोलिसांनी…’
Devendra Fadnavis on Maratha Morcha: जालन्यात मराठा आंदोलकांवर पोलिसांनी केलेल्या लाठीहल्ल्याप्रकरण गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया देताना सांगितलं की, आधी आंदोलकांनी दगडफेक केली म्हणून पोलिसांनी त्यांच्यावर लाठीहल्ला केला.
ADVERTISEMENT

Devendra Fadnavis on Maratha Morcha Lathihalla: मुंबई: जालन्यातील (Jalna) अंतरवाली सराटी गावात मराठा आंदोलकांना (Maratha Morcha) पोलिसांकडून झालेल्या अमानुष मारहाणीनंतर राज्यभरातील वातावरण तंग झालं आहे. राज्यात काही ठिकाणी जाळपोळ देखील करण्यात आली आहे. अशावेळी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे याबाबत सविस्तर प्रतिक्रिया देताना म्हणाले की, मराठा आंदोलकांनी पोलिसांना घेरून आधी दगडफेक केली. म्हणून पोलिसांनी लाठीहल्ला (Lathihalla) केला. मात्र, अनेक आंदोलकांचा आरोप आहे की, पोलिसांनी सुरुवातीला लाठीहल्ला केला. (maratha protesters pelted stones first so the police resorted to baton attack devendra fadnavis gave the exact information about the incident in jalna)
दरम्यान, ही घटना नेमकी काय आहे आणि कशी घडली याबाबत देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देताना नेमकी माहिती दिली आहे.
जालन्यातील मराठा आंदोलकांवर अमानुष लाठीहल्ला, पाहा गृहमंत्री फडणवीस नेमकं काय म्हणाले.
‘जालन्यातील घटना ही दुर्दैवी पण आहे आणि गंभीरपण आहे. पण त्याठिकाणी जे उपोषणकर्ते होते त्यांच्याशी स्वत: मुख्यमंत्री बोलले होते. विविध प्रकारे त्यांच्याशी आमचा संवाद सुरू होता. त्यांनी उपोषण परत घ्यावं.. कारण मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर सरकार गंभीरतेने काम करतेय पण हा न्यायालयाशी संबंधित सर्वोच्च न्यायालयाशी संबंधित विषय आहे. त्यामुळे हा विषय काही एका दिवसात संपणारा नाही. तो सोडविण्यासाठी वेगवेगळे प्रयत्न हे चालले आहेत. हे गंभीरपणे प्रयत्न सुरू आहेत.’
‘अशा प्रकारे त्यांना आम्ही सांगत देखील होतो. मात्र, त्या ठिकाणी ते काही उपोषण सोडायला तयार नव्हते. त्यांची प्रकृती खराब होत होती. त्यामुळे ही राज्याची जबाबदारी आहे की, अशा प्रकारे उपोषण होत असेल आणि तब्येत खराब होत असेल तर त्यांना नेऊन दवाखान्यात दाखल केलं पाहिजे. त्याप्रकारे काल देखील प्रयत्न केला.’
‘पण काल तिथे जमलेल्या लोकांनी सांगितलं की, आज नाही तुम्ही उद्या या.. उद्या त्यांना दाखल करू. पुन्हा प्रशासनाने ती भूमिका घेतली. प्रशासन पुन्हा आज त्या ठिकाणी गेलं आणि त्यांना विनंती केली.’