मुंबईतील गोरेगावात पत्नीनं बॉयफ्रेंडच्या मदतीने पतीचा केला खून, अखेर लेकीनंच केला 'असा' भांडाफोड

Crime News : मध्य प्रदेशातील सोनम रघुवंशीच्या प्रकरणाची पुनरावृत्ती आता मुंबईत घडली आहे. मुंबईतील गोरेगाव येथे पत्नीने आपल्याच पतीचा खून केला आहे.

mumbai crime news
mumbai crime news
social share
google news

बातम्या हायलाइट

point

सोनम रघुवंशीच्या प्रकरणाची पुनरावृत्ती

point

मुंबईतील गोरेगावात काय घडलं?

mumbai crime news : मध्य प्रदेशातील सोनम रघुवंशीच्या प्रकरणाची पुनरावृत्ती आता मुंबईत घडली आहे. मुंबईतील गोरेगाव येथे पत्नीने आपल्याच पतीचा खून केला आहे. पत्नीने तिच्या बॉयफ्रेंडला हाताशी धरलं आणि पतीची हत्या केली, परंतु महिलेच्या थोरल्या मुलीने हे प्रकरण उघडकीस आणले. संबंधित प्रकरणात पोलिसांनी महिलेला अटक केली आहे. दरम्यान, पत्नीने स्वत:च तिच्या पतीला मारहाण करण्याचा कट रचला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पत्नीचं पतीशी अनेक दिवसांपासूनचे संबंध चांगले नव्हते. त्यानंतर दोघांमध्ये सतत वाद व्हायचा.

हे ही वाचा : "तुला स्वयंपाक येत नाही चल घरून 20 लाख घेऊन ये..." पुण्यात हुंड्यासाठी छळ अन् अखेर पीडितेनं...

नेमकं काय घडलं? 

पोलिसांनुसार, मुंबईतील गोरेगावच्या आरे कॉलनीत राहणाऱ्या राजश्री अहिरे (वय 35) पती भरत लक्ष्मण अहिरेसोबत बऱ्याच काळापासून वाद निर्माण झाला होता. राजश्री अहिरेचं चंद्रशेखर नावाच्या एका तरुणाशी प्रेमसंबंध होते. राजश्रीने आपला बॉयफ्रेंड चंद्रशेखरला हाताशी धरून संपवण्याचा कट रचला.

15 जुलै रोजी रात्रीच्या सुमारास चंद्रशेखरने महिलेचा पती भरतला गोरेगांव पूर्वेकडील भागात बोलावले. दोघांनीही एका आरोपीच्या मदतीने भरतला मारहाण केली. त्यानंतर पत्नीने पतीला एका रुग्णालयात नेण्याऐवजी घरी नेलं. भरतची प्रकृती दिवसेंदिवस बिघडू लागली, पत्नीने त्याला कसलीही मेडिकल मदत दिली नाही. अंतिम क्षणी भरतचा मृत्यू झाला.

राजश्रीच्या दाव्यावर पोलिसांकडून शंका उपस्थित

मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महिलेनं केलेलं कृत्य तिच्या दोन मुली आणि 3 वर्षाच्या मुलाने पाहिली. त्यांनी वडिलांच्या स्थितीबाबत नातेवाईकांना सांगितलं. नातेवाईक तिथे पोहोचले असता तेव्हा राजश्रीने दावा केला की भरत दुचाकी अपघातात गंभीर जखमी झाला. दरम्यान, पोलिसांनी राजश्रीने केलेल्या दाव्यावर शंका उपस्थित केली आहे.

हे ही वाचा : "तुला घरातील काम व्यवस्थित येत नाही, तुला शेतातलं काम..." लग्नाच्या चार महिन्यानंतर सासरच्यांचा छळ अन् सूनेनं उचललं टोकाचं पाऊल

पोलिसांनी राजश्रीला हत्येचा कट रचण्याचा आणि तिच्या पतीला जाणूनबुजून मारण्याच्या आरोपाखाली अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महिलेचा बॉयफ्रेंड चंद्रशेखर आणि त्याच्या एका साथीदार फरार आहे. दोघांचाही शोध सुरु असल्याचे सांगण्यात येत आहे.

 

हे वाचलं का?

    follow whatsapp