Nanded Hospital : नांदेडनंतर संभाजीनगरातही मृत्यूतांडव! ‘घाटी’त 10 रुग्णांचा मृत्यू

मुंबई तक

नांदेडमधील शासकीय रुग्णालयात चोवीस तासात 24 रुग्णांचा मृत्यू झाल्यानंतर छत्रपती संभाजीनगरातील घाटी रुग्णालयातही 10 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे आता आरोग्य व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

ADVERTISEMENT

Sambhajinagar Ghati Hospital 10 patients died 2 newborns including 24 hours 24 patients died Nanded Government Hospital
Sambhajinagar Ghati Hospital 10 patients died 2 newborns including 24 hours 24 patients died Nanded Government Hospital
social share
google news

Sambhajinagar Hospital : नांदेडमधील शासकीय रुग्णालयामध्ये 24 तासात 24 रुग्णांचा मृत्यू (24 patients died) झाल्याने मोठी खळबळ उडाली. त्यामध्ये 12 नवजात बालकांचा समावेश होता. त्यामुळे शासकीय आरोग्य व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले. नांदेडच्या घटनेनंतर आता संभाजीनगरमधील घाटी रुग्णालयातही (Ghati Hospital sambhajinagar) 24 तासात 10 रुग्णांचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. संभाजीनगरमध्येही 10 पैकी 2 नवजात बालकांचा समावेश असल्याने आता येथीलही आरोग्य व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे.

मृत्यूचे तांडव

नांदेडमधील शासकीय रुग्णालयात चौवीस तासात 24 रुग्णांचा मृत्यू झाल्याचे उघड झाल्यानंतर राज्यात खळबळ उडाली होती. त्यानंतर आता तशीच घटना संभाजीनगरमधील घाटी रुग्णालयातही घडली आहे. त्यामुळे संभाजीनगरमधील घाटीत मृत्यूचे तांडव पाहायला मिळाल्याचे मत व्यक्त होत आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात मृत्यू होण्याला जबाबदार कोण असा सवालही उपस्थित करण्यात येत आहे.

हे ही वाचा >> कांदा संकटाला ब्रेक, आजपासून लिलाव होणार सुरू, सरकार म्हणाले…

शासकीय कारभाराच भोंगळ कारभार

गेल्या काही दिवसांपासून शासकीय रुग्णालयातील औषध पुरवठा कमी होत आहे. त्याचा फटका रुग्णांना बसत आहे. अपुऱ्या औषध पुरवठ्यामुळे रुग्णांच्या जीवाशी खेळले जात असल्याचा आरोप जनसामान्यातून केला जात आहे. तर काही ठिकाणी काही दिवसांचाच औषध पुरवठा असल्याने तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

जनसामान्यांचा आधार ‘घाटी’

संभाजीनगरमध्ये असलेले घाटी रुग्णालय हे अनेक तालुक्यांसाठी आधाराचे केंद्र आहे. मात्र गेल्या चोवीस तासात 10 रुग्णांचा मृत्यू झाल्याने घाटी रुग्णालयाच्या प्रशासनावर सवाल उपस्थित केला जात आहे. संभाजीनगर जिल्ह्यातील अनेक तालुक्यांसाठी घाटी रुग्णालय हे आधाराचे केंद्रबिंदू आहे. मात्र नांदेडनंतर घाटी रुग्णालयात मृत्यूने थैमान घातल्याने याला जबाबदार कोण असा सवाल करत जनसामान्यांच्या जीवाशी खेळू नका अशी भावना व्यक्त केली जात आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp